famous actor Randall England passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी; कुटुंबाने महिनाभर लपवली निधनाची बातमी

Actor Death: 'बेवॉच' आणि 'जनरल हॉस्पिटल' फेम अभिनेत्याचे वयाच्या ७५ व्या वर्षी अन्ननलिकेच्या कर्करोगामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी भावूक निवेदनातून ही दुःखद बातमी दिली.

Shruti Vilas Kadam

Actor Death: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता, मॉडेल, लेखक आणि निर्माता रँडल इंग्लंड (Randall England) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. 'बेवॉच' (Baywatch) आणि 'जनरल हॉस्पिटल' (General Hospital) यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे ते विशेष ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की अन्ननलिकेच्या कर्करोगाशी झुंज देत असता २५ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुटुंबीयांच्या उपस्थितीत घेतला अखेरचा श्वास

रँडल इंग्लंड यांच्या निधनाची अधिकृत माहिती 'अल्टरनेटिव्ह क्रेमेशन अँड फ्युनरल सर्व्हिस'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. या निवेदनात त्यांचा उल्लेख 'रँडी' असा करण्यात आला आहे. ते अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त होते. अखेर कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. कुटुंबीयांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, रँडल हे प्रेमळ, मनमिळाऊ आणि इतरांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबीयांना त्यांच्यावर नेहमीच विश्वास होता. ते इतरांना प्रोत्साहन देत असत आणि योग्य वेळी मोलाचा सल्लाही देत असत. त्यांनी प्रेम केलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्या लोकांच्या आठवणींमधून त्यांचा वारसा कायम जिवंत राहील.

मॉडेलिंगमधून केली होती करिअरची सुरुवात

रँडल इंग्लंड यांचा जन्म २२ सप्टेंबर १९५१ रोजी ओक्लाहोमा सिटी येथे झाला होता. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी १९७० च्या दशकात मॉडेलिंगमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेत त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केला. किम स्टॅनली आणि स्टेला ॲडलर यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले होते.

'जनरल हॉस्पिटल'मधील भूमिकेमुळे मिळाली ओळख

१९८४ मध्ये रँडल यांना लोकप्रिय मालिका 'जनरल हॉस्पिटल'मध्ये जॅक स्लेटर ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपट निर्माता असल्याचे भासवून पोर्ट चार्ल्स शहरात येणाऱ्या त्यांच्या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. जवळपास एक वर्ष ते या मालिकेचा भाग होते. याशिवाय त्यांनी 'रुबी अँड ऑसवाल्ड', 'लुकर', 'स्टार क्रिस्टल', 'ड्रीम मशिन', 'स्कायस्क्रॅपर', 'हेलबॉर्न' आणि 'बेव्हरली हिल्स चिहुआहुआ' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 'बेवॉच'मधील कामासाठीही ते ओळखले जात होते. त्यांनी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. 'ऑल माय सन्स', 'द ग्लास मेनेजरी' आणि 'द थ्री सिस्टर्स' यांसारख्या नाटकांमधील अभिनयासाठी त्यांना १९९४ मध्ये ड्रामा-लॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कुटुंबीयांच्या आठवणी मागे ठेवून घेतला निरोप

रँडल इंग्लंड यांच्या पश्चात मुलगी मिकाएला रीड, जावई सॅम रीड, नात कॅथरीन आणि नातू ज्युलियन असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षे मनोरंजन विश्वात काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या आठवणी त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: काँग्रेसने सपाकडे किती जागांची मागणी केली? अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ कश्या करायच्या? महागड्या क्लिनरऐवजी सोपी घरगुती पद्धत समजून घ्या

Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

Career Growth : नोकरीत तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही! करिअरमध्ये पुढे जायचंय? आत्मसात करा ही ५ कौशल्ये

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये विरोधकांसह सत्ताधारी उत्तरले रस्त्यावर

SCROLL FOR NEXT