Brahmastra 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra 2 : रणवीर सिंग साकारणार देवची भूमिका? करण जोहरचा लाइव्ह चॅटमध्ये खुलासा

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र पार्ट १: शिव' रिलीज झाल्यापासून प्रत्येकजण विचारत आहे: देव कोण आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र पार्ट १: शिव'(Brahmastra) रिलीज झाल्यापासून प्रत्येकजण विचारत आहे: देव कोण आहे? चाहते शाहरुख खान, हृतिक रोशन आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांच्या नावांचा अंदाज लावत आहेत. या अटकळींमध्ये रणवीर सिंग आघाडीवर आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव'मध्ये देवची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, देवची भूमिका साकारण्यासाठी एका अभिनेत्याला करारबद्ध करण्यात आल्याची पुष्टी करण जोहरने केली आहे. करणने शनिवारी इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान याचा खुलासा केला.

करण जोहर सध्या दुबईत असून तो चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाईव्ह आला होता. लाइव्ह सत्रादरम्यान, एका सोशल मीडिया युजरने त्याला विचारले की अयान मुखर्जीच्या अस्त्रव्हर्समध्ये देव कोण आहे? करणने उत्तर दिले, "तुम्हाला आधीच आतली माहिती आहे, देव कोण आहे मग हे पुन्हा विचारण्याची गरज नाही."

या आठवड्याच्या सुरुवातीला, रणवीर सिंग 'ब्रह्मास्त्र भाग २: देव' मध्ये देवची भूमिका साकारत आहे हे सीक्रेट उघड झाले. एका व्हिडिओमध्ये फिल्म कंपेनियनच्या अनुपमा चोप्राने खुलासा केला आहे की अयानने रणवीरला या चित्रपटासाठी कास्ट केले आहे. व्हिडिओमध्ये, ती म्हणाली, 'मला आशा आहे की या चित्रपटाचे (ब्रह्मास्त्र भाग 1: शिव) निर्माते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत पार्ट टू करणार आहेत.'

'ब्रह्मास्त्र'मध्ये दीपिका पदुकोण ही अमृताच्या भूमिका सकारात आहे जी एक जल अस्त्र असते. तसेच ती शिवाच्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र, अयानने या चित्रपटात तिची एकच झलक दाखवली आहे, ज्यातून दीपिकाचे पात्र समोर आले आहे.

'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात ३०० कोटी रुपयांची कमाई केली. परंतु, 'ब्रह्मास्त्र पार्ट २: देव' च्या रिलीजसाठी चाहत्यांना ३ वर्षे वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT