Emraan Hashmi Health Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi Health: इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण, रांचीवरून परत येताच प्रकृती बिघडली; चाहते चिंतेत

Emraan Hashmi Health: अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाली असून H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. रांचीहून परतल्यानंतर तो आजारी पडला. डॉक्टरांनी विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला.

Shruti Vilas Kadam

Emraan Hashmi Health: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या ‘आवारापन २’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. मात्र, अशातच अभिनेत्याच्या तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्याची H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

शूटिंगसाठी गेला होता रांचीला

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान नुकताच एका शूटिंगच्या निमित्ताने रांचीला गेला होता. शूटिंगनंतर मुंबईत परतल्यानंतर त्याला बरं वाटतं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यामुळे त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घेतली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आला.इम्रानच्या जवळच्या सूत्राने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्याला सध्या पुरेशी विश्रांती घेण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, इम्रान हाश्मीकडून अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

‘आवारापन २’च्या यशाची जोरदार चर्चा

इम्रान हाश्मी त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. १४ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, ‘आवारापन २’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

दिशा पटानीसोबत चित्रपटगृहाला दिली भेट

‘आवारापन २’मध्ये इम्रान हाश्मीसोबत दिशा पटानी आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय सुविंदर विकी, विजयंत कोहली आणि पूरण गब्बी या कलाकारांनीही चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत . नितीन कक्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात इम्रान पुन्हा एकदा ‘शिवम पंडित’ या भूमिकेत दिसत आहे. आता ‘आवारापन २’नंतर या फ्रँचायझीचा पुढील भाग कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत उपोषण, दुसरीकडे प्रशासन अ‍ॅक्टिव्ह मोडवर

Dal Benefits : गॅस, अ‍ॅसिडिटी टाळायचीय? मग डाळ निवडताना डॉक्टरांचा हा सल्ला दुर्लक्षित करू नका

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारची मंजुरी! कुठून कुठे धावणार? कसा आहे नवा मार्ग?

Dreams Fact : स्वप्नात वारंवार दिसणाऱ्या या' ५ गोष्टी; मानल्या जातात Universal Signs

Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT