Elvish Yadav Death Threat saam tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav Death Threat: ४८ तासांत १० कोटी दे, अन्यथा...; बिग बॉस स्टारला बिश्नोई गँगची जिवे मारण्याची धमकी

Elvish Yadav Death Threat: 'बिग बॉस OTT 2'चा विजेता एल्विश यादव याच्याशी संबंधित खंडणीचा एक प्रकार समोर आला आहे. एल्विशने याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला असून, त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Elvish Yadav Death Threat: 'बिग बॉस OTT 2' चा विजेता एल्विश यादव हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या कार्यक्रमांमुळे आणि म्युझिक व्हिडिओंमुळे, तर कधी विविध वादांमुळे. आता एल्विश पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे; यावेळी कारण म्हणजे त्याच्याकडे करण्यात आलेली १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी. होय, एल्विश यादवला जीवे मारण्याच्या धमक्यांसह १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. एल्विश आणि त्याचे वडील या दोघांनाही एका आंतरराष्ट्रीय नंबरवरुन मेसेजेस आले. यामध्ये त्याला १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

एल्विशकडे खंडणीची मागणी

या मेसेजमध्ये एल्विश यादवला दोन दिवसांच्या आत १० कोटी रुपये देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही खंडणी न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर, त्याने गुरुग्राम (हरियाणा) येथील सेक्टर ५६ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आधी एल्विशला एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. त्याने तो कॉल उचलता आला नाही. त्यानंतर काही वेळातच त्याला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला, या मेसेजमध्ये १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या साथीदाराकडून धमकी

एल्विश यादवच्या तक्रारीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख 'रणदीप मलिक' (लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक साथीदार) अशी करून दिली आणि १० कोटी रुपयांची मागणी केली. हा मेसेज एल्विश यादव आणि त्याचे वडील या दोघांनाही पाठवण्यात आला होता; तसेच, दोन दिवसांच्या आत पैसे न दिल्यास त्यांच्यावर गोळीबार करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी त्याच्या घरावर गोळीबार झाला

या घटनेपूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाल्याचे एक प्रकरणही समोर आले होते. तीन मोटरसायकलवरून आलेल्या गुंडांनी त्याच्या घरावर सुमारे दोन डझन गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर सेक्टर ५६ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या संदर्भात पाच व्यक्तींना अटक करण्यात आली असून, परदेशातून कार्यरत असलेल्या 'भाऊ गँग'ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील प्रसिद्ध मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५० भाविक जखमी

Sambhajinagar: विहिरीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून वडील अन् २ मुलांचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

Thalapathy Vijay Photos: अभिनेता ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांच्याबद्दलच्या 'या' ५ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

राजभवनात हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपालांनी भर शपथविधीत थलापती विजय यांना रोखलं; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी

SCROLL FOR NEXT