Elvish Yadav Won Bigg Boss OTT 2 Instagram @jio Cinema
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Winner: 'Elvish Yadav'ने रचला इतिहास; वाईल्ड कार्ड स्पर्धकाने 'बिग बॉस ओटीटी 2'च्या घरात मारली बाजी

Winner of Bigg Boss OTT 2: पूजा भट, मनिषा रानी, बेबीका धुर्वे, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव हे टॉप ५ स्पर्धक होते.

Pooja Dange

Elvish Yadav Won Bigg Boss OTT Season 2:

'बिग बॉस ओटीटी २'च्या पर्वाची १७ जून ला सुरुवात झाली. १६ धाकडेबाज स्पर्धकांनी एन्ट्री घेतली. सगळेच स्पर्धक लोकप्रिय तर होतेच त्याचसोबत काहीजण कॉंट्रोव्हर्सीमध्ये अडकलेले देखील होते. अनेक चढ-उतार करत हा अखेर अंतिम टप्प्यात आला. तसेच नंबर १ ओटीटी शो झाला.

आज 'बिग बॉस ओटीटी २'चा ग्रँड फिनाले आहे. तर या ग्रँड फिनालेमध्ये पूजा भट, मनिषा रानी, बेबीका धुर्वे, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव हे स्पर्धक टॉप ५मध्ये पोहोचले.

बिग बॉसच्या घरातून टॉप ५ मधून पूजा भट, बेबीका धुर्वे, मनिषा रानी या रेसमधून बहर गेल्या. तर फुकर इन्सान म्हणजे अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव टॉप २ स्पर्धक झाले.

अभिषेक मल्हान सुरुवातीपासूनच या घरात होता पण एल्विश यादवने या स्पर्धेत उशीर एन्ट्री घेतली. परंतु काही दिवसात त्याने शोवर कब्जा केला. या दोन दमदार स्पर्धकांपैकी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांनासह 'बिग बॉस'मधील इतर स्पर्धकांना देखील होती.

अखेर तो निर्णायक क्षण आला आणि 'बिग बॉस ओटीटी २'ला विजेता मिळाला. सोशल मीडियावर राज्य करणारा किंग एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीसह त्याला २५ लाख रुपये मिळाले आहेत. एल्विशने त्याची ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनिषा रानीसोबत शेअर केली आहे.

'बिग बॉस ओटीटी २'ची सुरुवात फलक नाझ, जिया शंकर, अविनाश सचदेव, जद हदीद, आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी, अभिषेक मल्हान, मनीषा रानी, पुनीत सुपरस्टार, बेबीका धुर्वे, सायरस ब्रोअचा, पलक पूरस्वानी या स्पर्धकांनी केली.

तर एल्विश यादव हा या घरातील वाईल्ड कार्ड स्पर्धक होता. परंतु तोच बाजी मारून गेला. 'बिग बॉस'मध्ये या वाईल्ड कार्ड स्पर्धकाने कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलं आणि इतिहास घडवला आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रंका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT