Ekda Yeun Tar Bagha Team Seeks Blessing Of Ganapati Bappa Saam TV
मनोरंजन बातम्या

Celebrity At Lalbaugcha Raja: 'एकदा येऊन तर बघा'ची टीम राजाच्या चरणी; बाप्पाच्या आशीर्वादाने केली नवी सुरुवात

Ekda Yeun Tar Bagha Team: 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाच्या टीमने लालबाग आणि परळमधील गणपतीचे दर्शन घेतेले आहे.

Pooja Dange

Vanit Kharat, Prasad Kandekar Seeks Blessing Of Ganapati Bappa:

प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद खांडेकर यांनी मातब्बर विनोदवीरांना घेऊन या चित्रपट बनवला आहे. २४ नोव्हेंबरला 'एकदा येऊन तर बघा' हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या निमित्त चित्रपटाच्या संपूर्ण तिने लालबाग, परळ परिसरातील बाप्पाचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या प्रमोशनला धडाक्यात सुरुवात केली आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव, वनिता खरात, अभिनेता प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, रोहित माने हे चित्रपटातील कलाकार यावेळी उपस्थित होती.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाच्या टीमने लालबागच राजा आणि गणेशगल्लीचा राजा आणि चिंचपोकळीची चिंतामणी या गणपतीचे दर्शन घेतेले. तसेच चित्रपटाचे पोस्टर बाप्पाच्या चरणी अर्पण केले. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे मोशन पोस्टर १८ सप्टेंबर प्रदर्शित झाले होते.

या पोस्टरमध्ये सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी हे कलाकार दिसले होते. आता चित्रपटातील इतर कलाकार कोण आहेत हे बाप्पाच्या दर्शनामुळे कळले आहे. (Celebrity)

'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी देखील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'लेखक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा "एकदा येऊन तर बघा" रिटर्न जाणार नाही 24 नोव्हेंबर पासून सिनेमागृहात' असे कॅप्शन प्रसाद खांडेकर यांनी या पोस्टला दिले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT