Porn Racket Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला FIR

पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन, त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.

हे देखील पाहा-

यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे. राज कुंद्रावर आरोप आहेत की फेब्रुवारी २०१९ मध्ये कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले होते. हे हॉटशॉट्स अॅप राज कुंद्राने यूके स्थित फर्म केनरिनला २५ हजार डॉलरमध्ये विकले होते. या कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत.

या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीकरिता केनरिन नावाच्या कंपनीने कुंद्राच्या कंपनी विहानशी करार केला होता आणि त्याच देखभालीसाठी विहान कंपनीच्या बँक खात्यात पैशांचा व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप्लिकेशन पॉर्न कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT