Gautami Patil
Gautami Patil  Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Dance Show: गौतमी पाटीलने कार्यक्रम मधेच थांबवला, तरुणाच्या कृत्याने आयोजक हैराण

Pooja Dange

Gautami Patil Dance Show News: गौतमी पाटील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याची टीका होत आहे. तिच्या डान्स शोवर बंदी घालण्याची मागली अनेक वेळा करण्यात आली आहे. तिच्या डान्स शोचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडिया व्हायरल होत असतात. गौतमीच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा गदारोळ झाल्याचे आपण पाहिले आहे. गौतमीच्या कार्यक्रमाचा आणखी एक असाच व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एक तरुणाने घुडघूस घातल्याचे पाहायला मिळाले आहे. गौतमी स्टेजवर डान्स करत असताना मंचावरील एका तरुणाने तिच्या बाजूला फटका लावण्याचा प्रयत्न केला. तरुणाचे हे कृत्य पाहून गौतमीने लगेच तिचा डान्स थांबवला. त्वरित आयोजकांनी त्या तरुणाला बाजूला केले.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. गौतमी डान्स करत असताना एक तरुण तिथे फटका लावत होता. हे पाहून गौतमीने लगेच डान्स थांबला आणि ही घटना आयोजकांच्या लक्षात आणून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

गौतमीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा विघ्न आले आहे. तिच्या कार्यक्रमामध्ये अनेकदा विचित्र प्रकार घडल्या आहेत. कधी तरुणाने थेट स्टेजवर धाव घेतली आहे. तर कार्यक्रमादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साम टीव्हीवर झालेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमीने तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT