Dream Girl 2 Promotion In Bigg Boss OTT 2  Instagram
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 Promotion: बिग बॉस ओटीटी 2 मध्ये आयुष्मान आणि अनन्या च्या उपस्थितीत ड्रीम गर्ल 2चं प्रमोशन

Dream Girl 2 Promotion In Bigg Boss OTT 2: 'बिग बॉस ओटीटी २'च्या ग्रँड फिनालेमध्ये ड्रीम गर्ल २ च्या टीमने हजेरी लावली आहे.

Chetan Bodke

Dream Girl 2 Promotion In Bigg Boss OTT 2: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ह्या Bigg Boss OTT 2 ला अवघ्या काही तासातच विजेता मिळणार आहे. या शोचा नुकताच ग्रँच फिनाले सुरू झाला असून आता पर्यंत या शोमधून दोन स्पर्धकांना घराबाहेर जावा लागलं आहे. अशातच एकूण तीन स्पर्धक सध्या घरामध्ये असून त्या तिघांमधून कोण ट्रॉफी नेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 'बिग बॉस ओटीटी २'च्या ग्रँड फिनालेला नुकताच एका चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी पोहोचली आहे. ग्रँड फिनालेमध्ये ड्रीम गर्ल २ च्या टीमने हजेरी लावली आहे.

यावेळी प्रमोशन करिता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेने हजेरी लावली आहे. यावेळी दोघांनीही बिग बॉसमधल्या स्पर्धकांसोबतही संवाद साधला आहे. सोबतच कार्यक्रमाच्या सुरूवातीला बादशाहने परफॉर्म केला होता. यावेळी गाणं सादर करताना, सर्वच स्पर्धकांनी त्याच्या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला होता. सोबतच यावेळी बिग बॉसच्या घरात फ्लॅशबॅक देखील पाहायला मिळाला. सर्वच प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागा झालेल्या दिसल्या.

सोबतच यावेळी सलमानने त्याच्या 'किसी की भाई किसी की जान'मधील बिल्ली बिल्ली गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. बिग बॉसच्या घरात टॉप ५ मधून पहिली स्पर्धक पूजा भट्टनंतर आता बेबिका धुर्वे ही घराच्या बाहेर आली आहे. नुकतीच तिसरी ही स्पर्धक घराबाहेर पडली आहे. मनीषा राणी ही बिग बॉसच्या नुकतीच घरातून बाहेर आले आहे. बिग बॉसच्या घरात सध्या एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान हे दोन टॉप २ स्पर्धक आहेत. आता या दोघांमधून कोणता स्पर्धक Bigg Boss OTT च्या दुसऱ्या पर्वाची ट्रॉफी नेतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT