Dream Girl 2 Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 Box Office Collection: आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल-२'ची १०० कोटींकडे वाटचाल; नवव्या दिवशी कमाईत उसळी

Dream Girl 2 Collection: 'ड्रीम गर्ल-२' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.६९ कोटींची कमाई केली होती.

Pooja Dange

Dream Girl 2 Box Office Collection Day 9:

आयुष्यमान खुरानाचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ड्रीम गर्ल २' प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले आहेत. २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१९ मध्ये आलेल्या ड्रीम गर्लनंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत ७७.७० कोटींची कमाई केली असल्याचे सॅकनिल्क वृत्तात म्हटले आहे.

आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे यांनी पहिल्यांदाच 'ड्रीम गर्ल २' एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.६९ कोटींची कमाई केली होती. पहिल्या वीकेंडला चित्रपटाने ४०.७१ कोटींची कमाई केली.

तर पहिल्या सोमवारच्या सुरुवातीला चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या तुलनेत अर्धेचं कलेक्शन केले. रक्षाबंधनाच्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली.

तर दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारी चित्रपटाने अनुक्रमे ४.७ कोटी आणि अंदाजे ६ कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाला १०० कोटींचा पल्ला गाठण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.

'ड्रीम गर्ल २' अशा वेळी प्रदर्शित झाला जेव्हा गदर २ बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करत होता. त्यामुळे याचा फटका चित्रपटाच्या कलेक्शन बसू शकतो. तर त्याचसोबत अक्षचे य कुमारचा OMG२ देखील बॉक्स ऑफिस सेट होत होता. तर लवकरच शाहरुख खानचा जवान देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल २' अडचण निर्माण होऊ शकते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT