Nawaz ex-wife Aaliya Drops New Pic With Mystery Man
Nawaz ex-wife Aaliya Drops New Pic With Mystery Man Instagram
मनोरंजन बातम्या

Aaliya Siddiqui Life In Mystery Man: नवाजच्या पत्नीसोबत ‘मिस्ट्री मॅन’ला पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, आलियानं मिश्किल भाषेत सुनावले खडेबोल...

Chetan Bodke

Nawazuddin Wife Aaliya Shares Photo With Mystery Man: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे चर्चेत आहे. अनेक वाद झाल्यानंतर नवाजुद्दिनने त्याच्याकडून मानहानीचा खटला मागे घेणार असल्याची माहिती दिली. नुकताच नवाजुद्दिनची पत्नी आलियाने सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अद्याप तरी तिने त्याबद्दलची ओळख सोशल मीडियावर करून दिलेलली नाही. दोघांनाही एकत्र पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे. ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर आता आलियाने एका मुलाखतीत या ‘मिस्ट्री मॅन’बद्दल सांगितले.

आलियाने नुकतीच ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली, यावेळी मुलाखतीत तिने ‘मिस्ट्री मॅन’बद्दल सांगितले आहे. मुलाखतीत ती म्हणते, “मी माझ्या आयुष्यात आता फारच पुढे निघून गेली आहे. आमच्यातील नाते हे मैत्रीपेक्षा जास्त आहे. आम्ही एकमेकांना अद्याप तरी कमिट केले नसून एकमेकांमध्ये नाते आहे. माझे आता पुढचे आयुष्य मला माझ्या मुलांसोबत जगायचे असून त्यांना कोणताच त्रास द्यायचा नाही.”

सोबतच ती पुढे म्हणते, जेव्हा तुम्ही काही चांगले काम करतात, तरीही तुम्हाला लोकं वाईटच बोलतात. असं म्हणत तिने ट्रोलर्स आपल्या मिश्किल भाषेत खडेबोल सुनावले...

त्यानंतर पुढे आलिया म्हणते, माझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती खूपच चांगली असून ती खरोखरची व्यक्ती आहे. मी त्याच्या प्रेमात पैसा पाहून नाही तर त्याची बुद्धिमत्ता पाहूनच त्याच्या प्रेमात पडली. पैसा तुम्हाला आनंद देत नाही, पण एखादी व्यक्ती तुम्हाला नक्कीच आनंदित करते. तो मुळचा भारतीय नसून इटलीचा रहिवाशी आहे. आम्ही एकमेकांना दुबईमध्ये भेटलो. तो माझा आणि माझ्या भावनांचा खूप आदर करतो, आणि मुख्य म्हणजे, तो माझी खूप काळजी घेतो. आम्ही अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतो.” आलियाने मुलाखतीत त्याचे नाव अद्याप सांगितलेले नाही. (Entertainment News)

तिच्या या पोस्टवर एका नेटकरीने कमेंट केली की, तु आडनाव कधी बदलणार?, यावर तिने हो लवकरच असं म्हणत तिने कमेंट केले. सोबतच आणखी एक जण म्हणतो, नवाजला तू ब्लॅकमॅल करून पैसे कमावतेय का?, नवाजुद्दिनला खरंच तुझी गरज होती, आणि तू काय करून बसलीस? असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

नवाजुद्दिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या तो ‘जोगिरा सारा रा रा रा’ चित्रपटामुळे तो कमालीचा चर्चेत असून सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नवाजचे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यातीलच नवाजचा ‘हड्डी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

Health Tips: या लोकांनी फणस खाऊ नये

Today's Marathi News Live: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

SCROLL FOR NEXT