Saure Ghar Song Out  Saam TV
मनोरंजन बातम्या

Yaariyan 2 Song: सनई-चौघड्यांच्या जोडीला कॉमेडी आणि ड्रामा... 'यारियां 2'मधील 'सौरे घर' गाणे प्रदर्शित

Saure Ghar Song Out: Yaariyan 2, चित्रपटातील पहिले गाणे 'सौरे घर' आज प्रदर्शित झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yaariyaan 2 Song Saure Ghar Out:

Yaariyan 2, चित्रपटातील पहिले गाणे 'सौरे घर' आज प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बीट्स आणि म्युजिक यावर्षीच्या लग्नाच्या सीझनमध्ये तुम्हाला थिरकायला भाग पडणार आहेत. तसेच अनेकांचे फेव्हरेट गाणे होणार आहे. लोकांना हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकायला आणि त्यावर नाचायला मजा येणार आहे.

दिव्या, मीझान आणि पर्ल यांच्यातील नाते या गाण्यात दाखविण्यात आले आहे. हे तिघे फक्त चुलत भावंडेच नाही तर बेस्ट फ्रेंड देखील आहेत. विशाल मिश्रा आणि नीती मोहन यांनी हे गाणे गायले आहे. मनन भारद्वाज यांनी या गाण्याला संगीत दिले असून त्याचे बोल देखील लिहिले आहेत. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केलेले 'सौरे घर' हे गाणे इमोशनल, कॉमेडी आहे.

हा फूट टॅपिंग ट्रॅक सर्व वयोगटातील लोकांना आवडेल आणि प्रत्येक पार्टी आणि लग्नाच्या वेळी लोकांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक असेल. प्रेक्षकांना नाचायला लावणारं हे एक गाणं आहे. यारियां 2 मधील 'सौर घर' हे गाणे आज रिलीज झाले आहे आणि आता ते टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

गुलशन कुमार आणि टी-सीरीज फिल्म्स आणि राव आणि सप्रू फिल्म्स प्रोडक्शनचे यारियां 2 सादर करतात. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, वारिना हुसैन आणि प्रिया वारियर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष माहेश्वरी निर्मित, राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

Thursday Horoscope : या 4 राशींसाठी मंगळवार ठरणार खास! पैसा, नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

SCROLL FOR NEXT