Disney+ Hotstar Down Instagram @disneyplushotstar
मनोरंजन बातम्या

Disney+ Hotstar Down: गेल्या तासभरापासून हॉटस्टारचे सर्व्हर डाऊन

'Disney+ Hotstar'वर येतोय एरर.

Pooja Dange

Disney+ Hotstar Trending On Twitter: भारतातील आणि जगातील सर्वाधिक पहिला जाणाऱ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक, डिस्ने प्लस हॉटस्टार क्रॅश झाला आहे. गेल्या एक तासापासून अनेक युजर्सना हया त्रास सहन करावा लागत आहे. आज युजर्स भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना आणि द नाईट मॅनेजर पाहण्यासाठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर गेले होते, तेव्हा हॉटस्टारने एरर दाखवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर #HotstarDown ट्रेंड करायला सुरुवात झाली. अनेकजण हॉटस्टार टॅग करत याविषयी विचारात आहेत. भारतातील नाहीच तर जगभरातील युजर्सना हा एरर येत आहे.

Downdetector.in वर 500 हून अधिक लोकांनी हॉटस्टार बंद असल्याची नोंद केली आहे. ट्विटरवर युजर्स लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्येचा स्क्रीनशॉट देखील शेअर करत आहेत.

Disney+ Hotstar ने यावर युजर्सना प्रतिसाद दिला आहे आणि सांगितले आहे की, आमच्या अॅप्स आणि वेबवर अनपेक्षित तांत्रिक समस्या उद्भवली आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आश्वासन दिले आहे की समस्या लवकरच सोडवली जाईल याची खात्री देतो. आमची टीम यावर काम करत आहे.

डेस्कटॉप आणि मोबाईलवर दोन्ही ठिकाणी डिस्नी प्लस हॉटस्टार वापरकर्त्यांनी समान अडचण येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. युजर्सने तक्रार केली आहे की 45 मिनिटे हे प्रॉब्लेम येत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम केला जात आहे. आउटेजमुळे सामना पाहण्यासाठी लॉग इन करण्यात समस्या निर्माण होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT