City Of Dreams 3 Teaser Disney Plus Hotstar YouTube
मनोरंजन बातम्या

City Of Dreams 3 Teaser: ‘तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ है...’सिटी ऑफ ड्रीम्सचा आगामी सीझन येणार; चर्चा तर होणारच...

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दोन्हीही सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्या नंतर आता तिसरा सिझनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

City Of Dreams 3 Teaser: सध्या वेब विश्वातील अनेक वेब सीरिज कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनची सर्वत्र बरीच चर्चा सुरू होती. दोन्हीही सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्या नंतर आता तिसरा सिझनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनचा टीझर प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री प्रिया बापट हिने शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, अतुल कुलकर्णी हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिसले. हा टीझर सर्वत्र कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे. (OTT)

प्रियाने शेअर केलेल्या टीझरमध्ये, “मजाक बना के रखा है राज्य के पॉलिटिक्स का, हर कोई फटाफट पार्टी बदल रहा है. जब अपने सगेही कुर्सी खिचने लगते है तो…, अभी तो इस राज्य की संगीत कुर्सी मै राजधानी को भी मौका चाहिए, लेकीन इस राज्य का रिमोट कंट्रोल दिल्लीसे हमेशा दूर ही रहेगा, ये वादा है… एक गायकवाड का… तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ है...”

अतुल कुलकर्णींच्या या लक्षवेधी डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या हा टीझर कमालीचा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. टिझरपाहून सर्वांनाच तिसऱ्या सिजनची उत्सुकता लागली असून कधी प्रदर्शित होणार आहे, हा प्रश्न चाहते कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत.

लवकरच ही वेब सीरिज ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ वर प्रदर्शित होणार असून या मध्ये बॉलिवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रिया बापट सोबत अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. राजकीय ड्रामा असणाऱ्या या वेब सीरिजचे नागेश कुन्नूर यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT