Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ulta Chashma: 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये होणार दया बेनची रिएन्ट्री

दिशा वकानीच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घ्यावे लागेल, कारण दया बेन मालिकेचा जीव आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही एक सुप्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र विशेष आहे. त्यातही दया बेन म्हणजे मालिकेचा जीव. गेल्या तीन वर्षांपासून दया बेन आपल्याला मालिकेत दिसत नव्हती. परंतु आता तिची मालिकेत रिएन्ट्री होणार आहे असे म्हटले जात आहे. दया बेन हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. दिशा मॅटर्निटी ब्रेकवर असल्याने ती मालिकेपासून दूर होती. मात्र दिवाळीच्या आधी दिशा पुन्हा मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. (TV Serial)

'तारक मेहता का उलटा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी, दिशा वकानीच्या संपर्कात होते. निर्मात्यांनी दिशाला मालिकेत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. जर यावेळी दिशा मालिकेत परत आली नाही तर तिला रिप्लेस करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती दया बेन हे पात्र प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

दया बेन या मालिकेचा जीव आहे. गेली तीन वर्ष दया बेन या मालिकेत न दिसल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. त्यात मालिकेतील इतर कलाकार सुद्धा मालिका सोडून जात आहेत. त्यामुळे निर्मात्यांना दिशा वकानीकडून अपेक्षा आहेत. मालिकेतील दया बेन या पात्रावर प्रेक्षकांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे दिशा व्यतिरिक्त इतर कुणालाही दया बेन म्हणून घेण्यास निर्माते तयार आहेत.

यापूर्वी निर्माते असित कुमार मोदी यांनी दिशा वकानीबद्दल माहिती देत सांगितलं होतं की, "लग्नानंतर काही काळ तिने काम केले. त्यानंतर मॅटर्निटी ब्रेक घेतला, तिने मालिका कधीच सोडली नव्हती. आम्हाला अपेक्षा आहे की दिशा पुन्हा मालिकेत येईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

SCROLL FOR NEXT