Director Pravin Tarde  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2: 'धर्मवीर २' चित्रपटावर ठाकरे गटाची टीका; दिग्दर्शक प्रविण तरडेंनी दिलं प्रतिउत्तर, नेमकं काय म्हणाले? वाचा

Saam Tv

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धर्मवीर २' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळताना दिसतेय. २०२२मध्ये 'धर्मवीर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या सिक्वलची उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यांनी पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

'धर्मवीर २' या चित्रपटाचे पटकथन आणि दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले असून या चित्रपटामध्ये अभिनेता क्षितिज दाते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. 'धर्मवीर २' हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रददर्शित झाला होता. सध्या 'धर्मवीर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

प्रेक्षकांकडून चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला भरभरुन प्रतिसाद मिळणार आहे. सर्वत्र 'धर्मवीर २' या चित्रपटाची हावा पसरलेली पाहायला मिळतेय. पुण्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या तर्फे पुणेकरांसाठी धर्मवीर आनंद दिघे यांचा 'धर्मवीर २' या चित्रपटच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे. 'धर्मवीर २' हा चित्रपट पाहाण्यासाठी पुण्यातील हडपसर भागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. विषेश म्हणजे चित्रपटसाठी चित्रपटगृहांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

या दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शकप्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक आणि 'धर्मवीर २' या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटगृहामध्ये उपस्थित हेती. 'धर्मवीर २' या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शिक प्रविण तरडे म्हणाले की,"विरोधक 'धर्मवीर २' या चित्रपटावर टीका करतात परंतु, त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून देखील चित्रपटावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. त्यांनी तर हा चित्रपट आवर्जून पाहावा." या चित्रपटामध्ये माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक महत्त्वाची सीन पाहायला मिळतोय. त्यांच्या एन्ट्रीच्या वेळी चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांसह आणि शिट्यांचा कडकडाट पाहायला मिळत आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election commission PC : राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे

Plastic Rice : तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Senate Election : मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार? 1 ऑक्टोबरला 'घड्याळ'चा फैसला?

Maharashtra Politics : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT