Avatar: The Way of Water Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avatar The Way Of Water: 'अवतार 2'च्या रेकॉर्ड ब्रेक कमाईने बॉक्स ऑफिसवर धुरळा...

जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' चित्रपटाची वाट प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

Chetan Bodke

Avatar The Way Of Water Box Office Collection: अखेर तो क्षण आला... ज्याची सर्व प्रेक्षक गेल्या 13 वर्षांपासून वाट पाहत होते. होय, हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट 'अवतार द वे ऑफ वॉटर' म्हणजेच अवतार 2 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 'अवतार 2' ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री करत जबरदस्त कमाई केली आहे. या हॉलिवूड चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी किती कमाई केली आहे हे जाणून घेऊया.

जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' चित्रपटाची वाट प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. हा चित्रपट शुक्रवारी 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि सर्व चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली. 'अवतार द वे ऑफ वॉटर' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात करेल.' अशी अपेक्षा होती, पण तसंच झालं.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, अवतार पार्ट 2 ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आगामी काळात 'अवतार 2' कमाईच्या बाबतीत नक्कीच मोठा विक्रम करेल, यात शंका नाही.

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या 'अवतार द वे ऑफ वॉटर'ने कलेक्शनच्या बाबतीत अनेक हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्पायडर-मॅन - नो वे होम' ने ३२ कोटींची कमाई केली होती तर 'Avengers Infinity War' ने पहिल्याच दिवशी ३१ कोटींची केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देणार- मुख्यमंत्री

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

४ नव्या अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत; महाराष्ट्रासहित ४ राज्यांना होणार फायदा, मार्ग आणि वेळापत्रक कसे असेल?

SCROLL FOR NEXT