dinesh hingoo  Saam tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

Bollywood Stories: 86 वर्षीय दिनेश हिंगू अजूनही काम करत आहेत. डॉक्टरांच्या खर्चासाठी पैसे कमवावे लागतात, असा खुलासा त्यांनी केला असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Shruti Vilas Kadam

Bollywood Stories: बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनेश हिंगू सध्या त्यांच्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दिनेश यांनी नेहमीच सर्वांना हसवलं आहे. त्याने ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांची सध्याच्या परिस्थितीने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. 86 वर्षांच्या वयातही ते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले असून, यामागचे कारण ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये दिनेश हिंगू यांनी सांगितले की, वाढत्या वयातही त्यांना आर्थिक गरजांमुळे काम करावे लागत आहे. विशेषतः डॉक्टरांच्या उपचारांसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "मी आता ८६ वर्षांचा झालो आहे. मी कामासाठी बाहेर जातो. नुकतेच, मी पडलो आणि मला दुखापत झाली. ती दुखापत आता बरी झाली आहे, पण डॉक्टरांकडे जाण्यासाठी मला पैशांची गरज आहे. डॉक्टर कधी ५,००० रुपये मागतात, तर कधी ६,०००. 'कॅरेक्टर आर्टिस्ट'ना इतके पैसे मिळत नाहीत. मी ब्लॅक-अँड-व्हाइट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, मी गुजराती आणि राजस्थानी चित्रपटांमध्येही काम केले आहे. डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज असते. मी आजही कधीकधी काम करण्यासाठी जातो. जर मला बोलावणे आले तर.

दिनेश हिंगू यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कॉमिक टाइमिंगमुळे ते प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत. मात्र, त्यांनी सांगितले की, कॅरेक्टर आर्टिस्ट्सना अपेक्षेप्रमाणे मानधन मिळत नाही, त्यामुळे आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे कठीण जाते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्स करुन प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, इतक्या महान कलाकारांना आर्थिक अडचणी आणि संकटांशी झुंजताना पाहणे हृदयद्रावक आहे. दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली की, ते एक अत्यंत उत्कृष्ट अभिनेते आहेत; असे असूनही, बॉलिवूड विश्वात त्यांच्या कामाची कोणतीही कदर केली नाही. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, इतक्या मोठ्या संख्येने चित्रपटांमध्ये काम करूनही, त्यांच्याकडे डॉक्टरांकडे जाण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत यापेक्षा वाईट काय असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT