Aata Vel Zaali Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aata Vel Zaali Movie: इच्छामरणावर आधारित 'आता वेळ झाली', दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत

Dilip Prabhavalkar And Rohini Hattangadi: 'आता वेळ झाली' या चित्रपटाची (Aata Vel Zaali Movie) त्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी हे मुख्य भूमिकेत असणार आहे.

Priya More

Aata Vel Zaali Movie Release Date:

मराठी सिनेरसिकांसाठी यंदाचे वर्ष देखील खूपच खास राहणार आहे. या वर्षात देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी असणार आहे. काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर अनेक चांगल्या कंटेट असलेल्या चित्रपटांची घोषणा केली जात आहे. नुकताच अभिनेते प्रतीक गांधी यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

'आता वेळ झाली' या चित्रपटाची (Aata Vel Zaali Movie) त्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) हे मुख्य भूमिकेत असणार आहे.

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित आणि लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आले आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळणार आहे.

Aata Vel Zaali Movie

या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर आणि अभिनव पाटेकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'आता वेळ झाली' या चित्रपटाची निर्मिती दिनेश बंसल , जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन यांनी केली आहे.

डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी 'आता वेल झाली' या चित्रपटाची यापूर्वीच निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT