Dhurandhar 2  saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' चा चौथ्या दिवशी धमाका; 700 कोटींपासून काही पावलं दूर; वाचा वर्ल्डवाइड कलेक्शन

Dhurandhar 2 Box Office Collection Day 4 : रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ने रविवारी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात तब्बल 650 कोटींचा टप्पा आकडा ओलांडला आहे. चौथ्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'धुरंधर 2' लवकरच 700 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' चित्रपटाने रविवारी बक्कळ कमाई केली आहे.

सध्या सर्वत्र आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' ची चर्चा पाहायला मिळत आहे. थिएटरसुद्धा हाऊसफुल पाहायला मिळत आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटावर कलाकार मंडळी देखील आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. 'धुरंधर 2'च्या कथेत रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाने चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेत ५०० कोटी रुपयांचा आणि जगभरात ६९० कोटी रुपयांचा एकूण (gross) गल्ला जमवला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार भारतात 'पेड प्रिव्ह्यू' शोजमधून ४३ कोटी रुपयांचे (net) कमाई झाली. रिलीजच्या पहिल्या दिवशी १०२.५५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ८०.७२ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ११३.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चौथ्या दिवशी, २१,२०२ शोजमधून ११४.८५ कोटी रुपयांचा गल्ला 'धुरंधर २' जमवला आहे.

भारतात 'धुरंधर २' चे कलेक्शन ४५४.१२ कोटी रुपये आणि एकूण (gross) कलेक्शन ५४१.९७ कोटी रुपये इतके झाले आहे. याव्यतिरिक्त, परदेशातील व्यवसायातून एकूण कलेक्शनमध्ये आणखी १४९.३५ कोटी रुपयांची भर पडली आहे, ज्यामुळे 'धुरंधर: द रिव्हेंज' चे जगभरातील (global) सर्व भाषांमधील एकूण कलेक्शन ६९१.३२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'धुरंधर' हा चित्रपट केवळ हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता, तर 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. एकूण कमाईत हिंदीत १०७.०० कोटी रुपये, कन्नडमध्ये ०.०१ कोटी रुपये, मल्याळममध्ये ०.०९ कोटी रुपयांची कमाई केली. दुसरीकडे, तमिळ आणि तेलुगूमध्ये अनुक्रमे २.५० कोटी रुपये आणि ५.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदार करणार आंदोलन

Ashok Kharat case : रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या, SIT कडून चौकशी होणार?

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा जलजीरा घरी कसा बनवाचा? वाचा सोपी रेसिपी

Nashik Picnic Spots: नाशिकमध्ये फिरण्यासाठी 5 ठिकाणे सर्वात बेस्ट, एकदा गेलात की परत जावेसे वाटेल

Mrunal Thakur Photos : "जणू विश्वसुंदरी..."; मृणाल ठाकूरचा कातिल अंदाज पाहून चाहत्यांना लागलं याड

SCROLL FOR NEXT