‘धुरंधर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट
भावनिक सीनमुळे कलाकार ढसाढसा रडले
रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक
रणवीर सिंगचा 'धुरंधर २' हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे, पण तुम्हाला माहित आहे का की एका दृश्याचे शुटिंग झाल्यानंतर सेटवरील सर्वजण भावूक झाले होते, कोणता सीन आहे ते जाणून घेऊ. रणवीर सिंगचा चित्रपट 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे.
चित्रपटाने प्रदर्शनापासूनच अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. सर्वत्र धुरंधरची क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर धुरंधर चित्रपटाच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर बंदी असूनही पाकिस्तानातही धूरंधर चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने सिनेमा डाऊनलोड करून पाहत आहेत. चित्रपटातील अभिनेत्यांनी दमदार काम केलंय. पण तुम्हाला माहितीये का धुरंधर'मधील एका दृश्याचे चित्रीकरण केल्यानंतर रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना भावूक होत रडू लागले होते? चला जाणून घेऊया ते कोणते दृश्य होते?
खुद्द आर. माधवनने हा खुलासा केला आहे. धुरंधर या चित्रपटात आर. माधवनने अजित डोवाल यांची भुमिका केली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना, आर. माधवनने सांगितले की, चित्रपटात २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे चित्रण करणारे एक दृश्य आहे, यात रहमान डैकेत आणि मेजर इक्बाल यांना आनंद होतो, रणवीर सिंग आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यासोबत टाळ्या वाजवत असतो. हा अभिनय झाला पण सीनचं शुटिंग संपल्यानंतर सेटवरचे वातावरण खूप गंभीर झाले होते.
या सीनचे चित्रीकरण करताना अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना हे ढसाढसा रडू लागले होते. कारण आम्ही भारतीय आहोत, आणि आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे याच्याशी जोडले गेलो. हे एक असे दृश्य होते जे सेटवरील कोणालाही भावूक करणारे होतं, अभिनेता आर. माधवन म्हणाला.
'धुरंधर' हा चित्रपट बनवणे अजिबात सोपे नव्हते. त्यासाठी सखोल रिसर्च करावा लागला. यामुळे चित्रपटाचे बजेट वाढवावे लागले. हा चित्रपट बनवण्यासाठी तीन वर्षे कठोर परिश्रम घ्यावी लागली. त्याचेच फळ आता सर्वांसमोर आहे. दरम्यान या चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षाही जास्त लोकप्रिय ठरला आहे. प्रदर्शित होऊन अजून एक आठवडाही झालेला नाही, पण त्याने बॉक्स ऑफिसवर आधीच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान 'धुरंधर २' या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आधीच मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट अनेक विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.