Sushant Shelar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Shelar: 'दुनियादारी' गाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखणंही कठीण, तब्येत पाहून नेटकरी चिंतेत

Sushant Shelar Viral Video : 'दुनियादारी' फेम अभिनेता सुशांत शेलारचा लूक पाहून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

Manasvi Choudhary

धर्मवीर 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांची वाढली होती. नुकताच चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर झाला यावेळी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मराठमोळा अभिनेता सुशांत शेलार देखील आला होता. यावेळी त्यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

धर्मवीर 2 या चित्रपटाची सध्या सर्वत्र उत्सुकता आहे. नुकताच रिलीज झालेल्या या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक दिसत आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर, पोस्टर आणि ग्रँड प्रिमियरचे सर्व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता सुशांत शेलार दिसत आहे. ज्याला पाहून नेटकऱ्यांना प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांत शेलार हा अंत्यत वेगळा दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीला काही झालंय का अशी विचारणा चाहते करत आहेत.

दुनियादारी चित्रपटातून आपल्या हटके स्टाईलने आणि डायलॉगबाजीने प्रेक्षकांची मने जिंकणारा सुशांत शेलार. मात्र सध्या सुशांतचा बदलेला लूक पाहून चाहते त्यांच्यावर प्रश्न निर्माण करत आहेत. तर अनेकांनी त्यांची तब्येत ठीक नाही आहे का अश्या प्रतिक्रिया दिल्या आहे. सुशांत मागील काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT