Dharmendra Share Post With Alia Instagram @aapkadharam
मनोरंजन बातम्या

Dharmendra's Post For Alia Bhatt : धर्मेंद्र यांची आलिया भटसाठी खास पोस्ट; जुन्या आठवणींना उजाळा

Dharmendra Share Post With Alia: धर्मेंद्रनी सोशल मीडियावर आलिया भटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

Pooja Dange

Dharmendra shared a behind-the-scenes glimpse : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या ८७ वर्षी देखील अभिनयात सक्रिय आहेत. रॉकी ओर रानी की काहानी या चित्रपटातून धर्मेंद्र आपल्या भेटीला येणार आहेत. ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक धर्मेंद्र होते. धर्मंद्र हे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र यांच्या एका पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतच नातू करण देओलच्या लग्नामुळे धर्मेंद्र चर्चेत होते. नातवाच्या लग्नात केलेल्या डान्सवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. धर्मेंद्रना खूप दिवसांनी नाचताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. धर्मेंद्र अनेक वर्षांनी 'रॉकी और राणी की कहानी' या चित्रपटात दिसणार आहेत. धर्मेंद्रना खूप दिवसांनी चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

धर्मेद्र हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर नेहमी काही न काही पोस्ट करत असतात. नुकताच धर्मेंद्रनी सोशल मीडियावर आलिया भटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो 'रॉकी और राणी की कहानी' चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे दिसत आहे.

या फोटोत आलिया धर्मेंद्र यांच्या बाजूला बसली आहे. या फोटोला कॅप्शन देत धर्मेंद्र यांनी म्हटल आहे की, 'मित्रांनो, प्रेमळ आलिया मला माझ्या रोमँटिक भूतकाळाची झलक दाखवत आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी'.

या फोटोत आलिया धर्मेंद्रना त्यांच्या भूतकाळातील काही फोटो दाखवत असल्याचे सांगितल आहे. अशी खास पोस्ट शेअर करत त्यांनी आलियाचं कौतुक केलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की कहानी' चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच झाला असून प्रेक्षकांनी टीझरला खूप प्रेम दिले आहे. 'रॉकी और रानी की कहानी' चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT