Dhanush New Look Saam TV
मनोरंजन बातम्या

South Star New Look: काय होता तू, काय झालास तू ! साऊथ सुपरस्टार, बाजूने गेला तरी ओळखू येणार नाही

Dhanush New Look: धनुष नव्या लूकमध्ये एकाद्या बाबासारखा दिसत होता.

Pooja Dange

Dhanush New Look Went Viral : साऊथ सुपरस्टार धनुषची सध्या चर्चा आहे. काल मुंबई विमानतळावर धनुष स्पॉट झाला. तेव्हापासून धनुष ट्रेंड होत आहे आणि याचे कारण आहे धनुषचा नवा लूक. धनुषला या लूकमध्ये ओळखणे अशक्य आहे. त्याला पाहून सर्वजण हैराण झाले.

धनुष खूप कमी वेळा पापाराझींच्या कॅमेरामध्ये कैद होतो. त्यामुळे यावेळी जेव्हा तो दिसला पापाराझीं या संधी पुरेपूर फायदा घेतला. मुंबई विमानतळावर धनुष्य पिंक स्वेट शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये स्पॉट झाला. त्याने ब्लॅक गॉगल देखील लावला होता. लांब दाढी आणि केस पाहून पापाराझींनी त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. (Latest Entertainment News)

धनुष या लूकमध्ये एकाद्या बाबासारखा दिसत होता. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. धनुषचा आगामी चित्रपट एखादा बायोपिक असणार की ऐतिहासिक चित्रपट अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

धनुषच्या या लूकवर सोशल मीडियातून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले, मला वाटले बाबा रामदेव कपडे घालून आले आहेत. तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, मला वाटतंय बाबा रामदेव यांचा बायोपिक बनणार आहे. तिसऱ्याने लिहिले, तुम्ही बाबा रामदेव आहात का?

याआधी स्वत: धनुषने सोशल मीडियावर त्याच्या लूकची झलक शेअर केली होती. फोटो शेअर करत लिहिले कॅप्शनमध्ये लिहिले, वाथी प्रमोशन स्टाइल, माझी आवडती हेअरस्टाईल. अभिनेत्याचा 'वाथी' हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता.

धनुषने 'वाथी'मध्ये दिसला होता. वेंकी अटलुरी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संयुक्ता मेननही दिसली होती. तर यावर्षी धनुष 'SIR' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री समंथा त्याच्यासोबत काम करणार आहे. धनुषने हॉलिवूडमध्ये त्याच्या डंका दाखवला आहे. 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटामध्ये धनुष काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT