Dhanashree Verma Post google
मनोरंजन बातम्या

Dhanashree Verma: चहल आणि आरजे महवशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चार शब्दांची धनश्रीची क्रिप्टीक पोस्ट, नेटकरीही म्हणाले...

Social Media Viral Post: भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आरजे महवशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचला. फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली.

Dhanshri Shintre

नृत्यांगना आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माचा क्रिकेटर युजवेंद्र चहलपासून फेब्रुवारी २०२५ मध्ये घटस्फोट झाला. चहल आणि धनश्रीने २०२० मध्ये लग्न केले होते, पण अवघ्या पाच वर्षांत त्यांचे संबंध तुटले. घटस्फोटानंतर, ९ मार्च रोजी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चहल आरजे महवशसोबत दिसला. त्यानंतर काही तासांत, धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली, ज्यावर सर्वांचं लक्ष गेलं.

धनश्री वर्माने तिच्या घटस्फोटानंतर एक पोस्ट 'इंग्रजी कोट' इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, त्यात लिहिले आहे की , "महिलांना दोष देणे ही नेहमीच एक फॅशन राहिली आहे." या संदेशाद्वारे, धनश्रीने सूचित केले की घटस्फोटाच्या सर्व जबाबदारीला तीच दोषी ठरवली जात आहे. तिच्या या पोस्टमुळे असे स्पष्ट झाले की ती या घटनांमधून सावरू शकत नाही आणि तिच्या भावनिक अवस्थेची ही एक झलक होती.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा संबंध तणावपूर्ण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला. धनश्री वर्माला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले आणि तिला शिवीगाळ केली गेली. घटस्फोटासाठी तीच दोषी ठरवली जात होती, पण तिने या बाबतीत काहीही बोलले नाही. घटस्फोटानंतरही धनश्री उघडपणे काहीच बोलत नाही, परंतु क्रिप्टीक पोस्टद्वारे ती तिचे विचार सोशल मीडियावर व्यक्त करत आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट एक महिन्यापूर्वी झाला असताना, चहलच्या नवीन नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. दुबईमध्ये आरजे महवशसोबत दिसल्यानंतर, अफवा पसरल्या आहेत की ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. याआधीही, चहल आणि महवश मुंबईतील एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, त्या वेळी महवशने डेटिंगच्या अफवांना नाकारले होते आणि त्यास खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT