Bollywood Director FIR Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Director FIR: प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर अडचणीत; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसात गुन्हा दाखल

Bollywood Director FIR: ‘धमाल 4’चे दिग्दर्शक इंद्र कुमार आणि निर्माता अशोक ठकेरिया यांच्याविरोधात कथित फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Bollywood Director FIR: बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट ‘धमाल’ फ्रँचायझी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘धमाल 4’चे दिग्दर्शक आणि निर्माते इंद्र कुमार तसेच निर्माता अशोक ठकेरिया यांच्याविरोधात कथित फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील फिल्म डिस्ट्रीब्यूशन कंपनी ‘ग्रँड मास्टर’चे मालक विकास बलदेवराज साहनी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी दोघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, 2019 मध्ये ‘ग्रँड मास्टर’ने ‘धमाल’ चित्रपटाचे जगभरातील वितरण हक्क आणि कॉपीराइट हक्क खरेदी करण्यासाठी 1.50 कोटी रुपयांची डील केली होती. हे हक्क विकताना संबंधित हक्क यापूर्वी कोणत्याही अन्य पक्षाला विकण्यात आलेले नाहीत, अशी माहिती डिस्ट्रीब्युटरला देण्यात आली होती. मात्र, नंतर साहनी यांना या चित्रपटाचे लाइफटाइम ओटीटी आणि डिजिटल हक्क यापूर्वीच शेमारू एंटरटेनमेंटला देण्यात आल्याचे समोर आले. हे हक्क 2015 मध्येच देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात जानेवारी 2020 मध्ये अशोक ठकेरिया यांनी जुन्या कराराबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2020 रोजी मारुती इंटरनॅशनल आणि शेमारू यांच्यात पूरक करार करण्यात आल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. या करारानुसार निर्मात्यांकडे केवळ एका सॅटेलाइट चॅनेलचे अधिकार राहिल्याचे सांगण्यात आले.

या व्यवहारामुळे ‘ग्रँड मास्टर’ला मोठा आर्थिक फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे. काही डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत होणारे व्यावसायिक करार रद्द झाल्याने कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच, जानेवारी 2023 मध्ये कायदेशीर नोटीस पाठवूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT