Marathi New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi New Song: देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊतचं नवीन गाणं येणार

Marathi New Song: देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत.

Manasvi Choudhary

देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे.

या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला अमेय मुळे यांनी संगीत दिलं आहे.

कोकणचा जावई म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड दर्याचं पाणी या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “माझी खूप आधीपासून इच्छा होती की एकदा तरी कोकणी गीतात काम करायचं. दिग्दर्शक विजय बुटे यांनी जेव्हा या गाण्याची संकल्पना माझ्याजवळ व्यक्त केली. तेव्हा मी फारच उत्सुक होतो. कोळी गेटअप मध्ये नाचताना खूप मज्जा आली. आणि समुद्र म्हणजे माझा आवडता विषय असल्या कारणाने, दिवसभर समुद्र किनारी बागडायला आणि शूटिंग करायला धम्माल आली. विशेष म्हणजे माझ्या कोळी लूकवर सोशल मीडियाद्वारे माझे फॅन्स छान छान कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे पाहून खूपच आनंद झाला.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

Fake Currency Scam : धक्कदायक! पैसे दुप्पट करून देतो सांगायचा, खऱ्या पैशांऐवजी द्यायचा खेळण्यातील नोटा, नेमकं प्रकरण काय?

Nashik : नाशिककरांनो पाण्याचा जपून वापर करा, शहरातील 'या' भागात आज पाणी नाही | VIDEO

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT