Devmanus; डाॅ. अजित कुमार झाला, चंदाच्या हातचं खेळणं  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devmanus; डाॅ. अजित कुमार झाला, चंदाच्या हातचं खेळणं

चंदाच्या हातचं खेळणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देवमाणूस Devmanus ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा artists जबरदस्त या सारख्या अभिनयातून यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रिय शिखरावर आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये आता आणखी एक नवे वळण आले आहे. यामध्ये चंदा या नामक एका तरुणीची एण्ट्री झालेली आहे.

विशेष म्हणजे आल्या-आल्याच तिने खलनायक देवी सिंगला मोठे आव्हान दिले आहे. ती देवी सिंगचे सर्व योजना हानून पाडताना दिसून येत आहे. त्याला ती चक्क आपल्या तालावर नाचवताना दाखवत आहे. झी वाहिनीने मालिकेचा प्रोमो रिलिज केलेला आहे. आणि यामध्ये देवी सिंग चंदावर राग व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, त्याला न घाबरता ती उलट त्यालाच धमकी देत आहे.

हे देखील पहा-

जर तू माझं ऐकलं नाहीस तर, लक्षात ठेव माझ्याकडे तुझ्या विरोधामध्ये अनेक पुरावे आहेत. अशी धमकीच त्याला देताना दिसून येत आहे. यानंतर त्याला अक्षरश: आपल्या तालावर नाचताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चंदाच्या मदतीने पोलीस देवी सिंगला पकडणार का? अशी प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला सशंय आहे. देवमाणूस ही मालिका साताऱ्यात झालेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.

या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्या प्रमाणे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने डॉक्टराचे सोंग पांघरुन १३ वर्षात मध्ये तब्बल ७ स्त्रियांना फसवले आहे. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडले होते. या पार्श्वभूमीवर " देवमाणूस " मालिकेचा शेवट देखील असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

" देवमाणूस " या मालिकेमधील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव हे आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालताना दिसून येत आहेत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळे ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोड मालिकेची उत्कंठा वाढताना दिसत आहे. येणाऱ्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT