Gautami Patil life Story Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: 'पोलिस संरक्षण न दिल्यास आम्ही देऊ'; गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ 'या' संघटनेने छेडले आंदोलन

लावणी कलावंत गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असताना तिच्यावर अश्लिल डान्स करत असल्याचा आरोपही होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gautami Patil: लावणी कलावंत गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असताना तिच्यावर अश्लिल डान्स करत असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

गौतमीच्या कार्यक्रमाला होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे तिला संरक्षण देण्याची मागणी दलित महासंघाने केली आहे, याच मागणीसाठी सांगलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दलित महासंघाच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. (latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लावणी कलावंत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना सध्या जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणामुळे तिचे अनेक कार्यक्रम रद्दही करण्यात येत आहेत. याच कारणामुळे गौतमी पाटीलला संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले, यावेळी गौतमीच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. (Sangli)

यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली. तसेच पोलिसांनी तिच्या कार्यक्रमांना संरक्षण न दिल्यास दलित महासंघाचे युवक कार्यक्रमस्थळी उभे राहुन गौमतीला संरक्षण देतील असेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, गौतमी पाटीलची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ असून तिच्या ठसकेबाज लावणीने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गौतमीच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे अनेकदा तणाव निर्माण होवून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळेच सुरक्षा देण्यीची मागणी केल्याचे दलित महासंघाने म्हणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT