Rashmika Mandanna Deepfake Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला...

Rashmika Mandanna Deepfake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Satish Kengar

Rashmika Mandanna Deepfake Video:

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी रश्मिकाचा एक फेक व्हिडिओ समोर आला होता. जो आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने बनवण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली होती आणि कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही महिन्यांपूर्वी रश्मिका मंदानाचा एक फेक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रश्मिका तसंच फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी चिंता व्यक्त केली होती. याप्रकरणी चिंता व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये ब्रिटिश इन्फ्लुएन्सर झारा पटेल काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीने झाराचा चेहरा एडिट करून रश्मिका मंदानाचा चेहरा लावला होता.

या व्हिडिओमध्ये रश्मिकाचा चेहरा झाराच्या चेहऱ्याशी बदलण्यासाठी आरोपींने एआयची मदत घेतली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT