Anil Kapoor Personality Rights Instagram @anilskapoor
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor’s Personality Rights: अनिल कपूरला 'मजनू भाई' नावाने हाक मारणं पडणार महागात, न्यायालयाने दिला मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?

Anil Kapoor: अनिल कपूर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली हाय कोर्टात एक याचिका दाखल होती.

Pooja Dange

Anil Kapoor Dialogue:

डिजिटलाजेशननंतर आता एआयचा सगळीकडे बोलबाला आहे. एआयच्या मदतीने अशक्य असं सगळं शक्य करता येत. सध्या लोक एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. एआयचा वापर करून सेलिब्रिटींवर आधारित वेगवेगळा कंटेंट बनवला जातो. यामध्ये सेलिब्रेटींचे फोटो आणि व्हिडीओ वापरले जातात. तसेच ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट देखील केले जातात.

काही लोक एआयचा वापर एवढ्या शिताफीने करतात की खरं काय आणि खोटं काय हे ओळखणं देखील कठीण होतं. यामुळे सेलिब्रिटींना त्याचा खूप मनस्ताप होतो. त्याचा परिणाम कलाकारांच्या प्रतिमेवर देखील होतो. त्यामुळे आता अनेक कलाकारांनी यावर कडक अ‍ॅक्शन घ्यायला सुरूवात सुरुवात केली आहे. अनिल कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे.

अनिल कपूर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली हाय कोर्टात एक याचिका दाखल होती. या याचिकेत अनिल कपूर यांनी त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि टोपणनाव यासाठी सुरक्षा मागितली आहे. दिल्ली हाय कोर्टाने यावर आज बुधवारी निर्णय दिला आहे. अनिल कपूरच्या बाजूने निर्णय देत कोर्टाने सांगितले आहे की, अनिल कपूर यांचे नाव, आवाज आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी निगडित कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी.

न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी अनेक वेबसाईटना उद्देशून म्हटले आहे की, कोणत्याही सेलिब्रेटींची नावे, आवाज किंवा फोटो यांचा बेकायदेशीर वापर करणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. असे केल्यास टेलिकम्युनिकेशन विभाग आणि केंद्र शासनाच्या आदेशाने ते त्वरित हटविण्याचे आदेश देण्यात येतील.

अनिल कपुरच्या आधी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित हक्काबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर्षी जानेवारीत केलेल्या या याचिकेत त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, त्यांचे नाव, फोटो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित कोणतीही गोष्ट त्यांच्या परवानगीशिवाय वापरू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT