shahrukh khan and deepika padukone image  SaamTv
मनोरंजन बातम्या

Jawan : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र?

दीपिका पदुकोणही शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातही दिसणार आहे.शाहरुख खान आणि 'जवान'या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली कुमार हे दीपिकाला या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम' या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यामुळे शाहरुख(shahrukh khan) आणि दीपिकाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर या जोडीने एकत्र 'हॅपी न्यू इअर', 'चेन्नई एक्स्प्रेस' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. आता पुन्हा ही जोडी एकत्रित रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी 'पठान' या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार आहेच, पण दीपिका पदुकोणही शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातही दिसणार आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि 'जवान'या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली (अरुण) कुमार हे (Atlee Kumar) दीपिकाला या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहेत. दीपिकाने या चित्रपटात छोटी पण, महत्त्वाची भूमिका साकारण्यास होकार दिला आहे. मात्र तिने अद्याप अधिकृतपणे या माहितीला दुजोरा दिलेला नाही. असे म्हटले जात आहे की, शाहरुख आणि अॅटलीने दीपिकाची हैदराबादमध्ये भेट घेतली होती, जिथे ती सुपरस्टार प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती.

दीपिका पदुकोण ही रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रम्हास्त्र'या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. दीपिकाच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिकाची झलक दिसली होती. दीपिका तिच्या कॅरिअरच्या शिखरावर आहे. ती सध्या 'पठान' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांचे चित्रीकरण करत आहे. याचबरोबर तिच्या 'द इंटर्न', 'फाइटर' आणि 'महाभारत' या चित्रपटांचे चित्रीकरणही लवकरच सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT