Deepika Padukone Saam TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone |अभिनेत्री दीपिका पदुकोण रूग्णालयात; नेमकं झालं तरी काय?

मागील अनेक दिवसांपासून दीपिका वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडची 'मस्तानी गर्ल' दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. अचानक सोमवारी प्रकृतीत अस्वस्थता वाटू लागल्याने दिपीकाला रात्री उशीराने ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्या तब्येतीबाबत खूप चिंतेत आहेत. माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून दिपीका चाचण्या साठी रूग्णालयात जात आहे.

दीपिका पदुकोणला सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. यामुळे तिला ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोशल मीडियावर एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. दीपिका पदुकोणच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रकृती व्यवस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.

दीपिका पदुकोणला सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले यामुळेच तिला ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. दिपीका पदुकोणच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रकृती व्यवस्थित असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने या बाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाची प्रकृती आता ठिक आहे. मात्र तिला रूग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंतेत आहेत. नेमके झालेय काय,असा प्रश्न त्यांना पडला आहे.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, दीपिका आलिया रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर आगामी काळात दिपीका शाहरूख खानसोबत दिसणार आहे. चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. सिद्धार्थ आंनद दिग्दर्शित चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT