Deepika-Ranveer Get Secretly Engaged  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Reveal Deepika's Secrete: काय सांगता! रणवीर - दीपिकाने २०१५ मध्ये गुपचूप केला होता साखरपुडा; 'कॉफी विथ करण'मध्ये स्टार कपलचा खुलासा

Deepika-Ranveer: रणवीर सिंगने आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टीचा उलघडा केला आहे.

Pooja Dange

Ranveer, Deepika 1st guest on 'Koffee with Karan 8':

करण जोहरचा बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण'चा ८ वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीजनच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण येणार आहेत.

'कॉफी विथ करण'चा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंगने आणि दीपिका पदुकोण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टीचा उलघडा करताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कॉफी विथ करण'चा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये रणवीर सिंगने खुलासा केला आहे की, त्याने दीपिकासोबत २०१५मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाच्या ३ वर्षेआधी दोघे एकमेकांसोबत एंगेज झाले होते. याविषयी सांगताना रणवीर म्हणाला, 'मी २०१५ मध्ये दीपिकाशी एंगेज झालो. कुणी येऊन तिला घेऊन जाण्याआधी मी चप्पल ठेवली.'

'कॉफी विथ करण'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग संपूर्ण ब्लॅक लूकमध्ये आले होते. करण जोहरने त्यांचे कौतुक करत त्यांना तुम्ही दोघे स्मोकी हॉट दिसत असल्याचे म्हटलं. त्यावर रणवीर करणला 'थँक यू ठरकी अंकल' असे म्हणाला.

करण जोहरने दीपिकाला विचारले की, 'तुला रॉकी ओर रानीमधील रॉकीला डेट करायला आवडेल का?' तर दीपिकाने उत्तर म्हटले, 'मी रॉकी रंधावाशी लग्न केले आहे.' (Latest Entertainment News)

यानंतर करणने दीपिका तिचे रणवीर व्यतिरिक्त कोणत्या अभिनेत्यासोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहे असे विचारले.

दीपिका हृतिक रोशनसोबत पहिल्यांदाच स्किन शेअर करणार आहे. 'त्यांचा फायटर' चित्रपट २५ जानेवारी २०२४ला प्रदर्शित होणार आहे.

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, आलिया आणि त्याचा 'रॉकी ओर रानी की प्रेम कहाणी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता रणवीर सिंग 'सिंघम रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साई मंदिरात पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT