मनोरंजन बातम्या

Deepika Padukone On Jawan: शाहरूख खानसाठी काय पण! दीपिका पदुकोणचा 'जवान'साठी मोठा त्याग

Deepika Padukone Relationship SRK:

Pooja Dange

Deepika Padukone Did Not Charge For Jawan:

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अनके बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. यात बाहुबली, केजीएफ सारखा चित्रपटांचा समावेश आहे. तर आता हा चित्रपटत 'गदर २'चा देखील रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज आहे.

दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अॅटली लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने कॅमिओ केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे सांगितले आहे.

दीपिका पदुकोणने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात शाहरुख खानसोबतच 'ओम शांती ओम' या चित्रपटातून केली आहे. शाहरुखच्या 'पठान' चित्रपटामध्ये देखील दीपिकाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण खूप चांगले मित्र आहेत. दीपिकाने 'जवान' चित्रपटातून हे सिद्ध केलं आहे. एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या दीपिका पदुकोणने शाहरुख आणि अॅटली यांच्या या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही.

'द वीक'शी संवाद साधताना दीपिकाने तिच्या मानधनाविषयी सांगितले आहे. 'जवान' चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'जवान'मधील कॅमिओसाठी किती पैसे घेतले, असे दीपिकाला विचारले असता तिने सांगितले की, 'मी या चित्रपटासाठी पैसे घेतलेले नाही. शाहरुख खान आणि रोहित शेट्टीच्या कोणत्याही चित्रपटामध्ये मी स्पेशल अपिरियन्स करायला नेहमीच तयार असते.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमध्ये एकमेकांचे लकी चार्म म्हणून ओळखले जातात. या दोघांनी एकत्र काम केले सर्व चित्रपट सुपरहिट नई ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

दीपिका म्हणाली की, 'आम्ही एकमेकांसाठी नशीबवान आहोत, परंतु आमचे नाते नशिबापेक्षा खूप जास्त आहे. मी अशा काही लोकांपैकी एक आहे ज्यांच्याशी शाहरुख संकोच न करता बोलतो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. मला वाटते की त्यात नशिबाची आम्हाला साथ आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT