Deepika- Ranveer Daughter Dua Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika- Ranveer Daughter Dua: लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाले दीपिका अन् रणवीर; एअरपोर्टवरचा VIDEO व्हायरल

Deepika- Ranveer Daughter Video: रणवीर आणि दीपिकाचा मुलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

सध्या बॉलिवूडचं स्टार कपल रणवीर आणि दीपिका त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. अलिकडेच दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर दीपिकानं चाहत्यांना गुडन्यूज शेअर केली होती. दीपिकाच्या मुलीचं नाव दुआ असं आहे. सध्या अभिनेत्री दीपिका आणि अभिनेता रणवीर आई-वडील झाल्याचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दीपिकाने सप्टेंबरमध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर काही दिवसांपूर्वीचं दीपिकाने सोशल मीडियावर मुलीच्या नावाची पोस्ट शेअर केली. दीपिकाने मुलीचं नाव दुआ का ठेवलं याबद्दल देखील सांगितलं. अशातच दीपिका -रणवीर मुलीसोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीर दोन महिन्यानंतर मुलीसोबत मिडिया कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नुकतंच दीपिका मुंबईतील कलिना विमानतळावर दिसली. यावेळी तिच्यासोबत पती रणवीर सिंह आणि मुलगी दुआ देखील आहे. मुलगी दुआसोबत पहिल्यांदाच हे कपल एकत्र बाहेर पडले आहेत. यावेळी दीपिका आणि रणवीरने पापाराझीसाठी पोज दिली. याचदरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दीपिका आणि रणवीर २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या ६ वर्षानंतर या दोघांनाही बाळ झाले आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई- बाबा झाले. सध्या दीपिकाने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला असून बाळाची काळजी घेताना दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT