Shubman Gill Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Shubman Gill Wedding : शुभमन गिल १० वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार? ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा

Shubman Gill Marry Ridhima Pandit : शुभमन गिलचं नाव आतापर्यंत सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात होतं. पण आता त्याचं नाव थेट एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

Chetan Bodke

क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींच्या रिलेशनची चर्चा कायमच रंगत असते. विराट- अनुष्का आणि हार्दिक- नताशानंतर आता आणखी एका क्रिकेटरच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. तो क्रिकेटर म्हणजे शुभमन गिल. शुभमन गिल सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे बराच चर्चेत आहे. त्याचं नाव आतापर्यंत सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात होतं. पण आता त्याचं नाव थेट एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. इतकच नाही तर, ते लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची तारीख आणि स्थळाचीही सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या सर्वांवर त्या अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिलेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन गिलचं बॉलिवूड अभिनेत्री रिद्धीमा पंडीतसोबत नाव जोडलं जात होतं. मध्यंतरी त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली होती. पण अशातच खुद्द अभिनेत्री रिद्धीमा हिने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. टेलिचक्करला दिलेल्या एका मुलाखतीत रिद्धीमा पंडीतने सांगितले की, "मला बऱ्याच पत्रकारांचे फोन येत होते आणि ते सर्व मला माझ्या लग्नाविषयीच विचारत होते. पण लग्न कुणाचं? मी तर लग्न करत नाही. जर मी लग्न करणार असेल तर मी स्वत: मीडियाला आणि माझ्या चाहत्यांना सांगेल. पण या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. ही बातमी खोटी आहे." असं रिद्धीमा व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिद्धीमा आणि शुभमन डिसेंबर २०२४ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही. शुभमन आणि रिद्धीमामध्ये एकूण १० वर्षांचं अंतर असून रिद्धीमा ३४ वर्षांची आहे तर शुभमन २४ वर्षांचा आहे. रिद्धिमा पंडितच्या कामाबद्दल सांगायचे तर, ती ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘हैवान’ आणि ‘द ड्रामा कंपनी’ यांसारख्या टिव्ही सीरियल आणि शोमध्ये दिसली होती. याशिवाय ती ‘खतरा खतरा’ आणि ‘बिग बॉस ओटीटी १’ मध्येही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT