Bigg Boss Ottians Instagram @officialjiocinema
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 1st Day : 'बिग बॉस ओटीटी २' सगळेच वरचढ ; काहींची नवी सुरुवात तर काहींचा पहिल्याच दिवशी रामराम

'Bigg Boss OTT' Season 2 Premiere : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आजपासून झाली आहे.

Pooja Dange

Bigg Boss OTT 2 Puneet Superstar Want Exit : 'बिग बॉस' सर्वाधिक टीआरपी असलेला टेलिव्हिजन शो आहे. टेलिव्हिजनसह हा शो ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला होता. आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आजपासून झाली आहे. या पर्वाची सुरुवात सलमान खानने केली. तसेच यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा भट देखील होती. जनतेची आवाज बनलेल्या सेलिब्रिटींपैकी एकाच आज बिग बॉस ओटीटी २मध्ये प्रवेश होणार होता.

बिग बॉस ओटीटी 2 च्या घरातील स्पर्धक

फलक नाझ, जिया शंकर, अभिषेक मल्हान (फुकरा इन्सान), मनीषा राणी, जद हदीद, आलिया सिद्दीकी, पुनीत सुपरस्टार, बेबिका ध्रुव आणि अविनाश सचदेव यांचा बिग बॉस बॉस ओटीटी २ च्या घरामध्ये प्रवेश झाला.

पण या स्पर्धकांमध्ये दोन नावे अशी होती ज्यांचा बिग बॉसच्या घरामध्ये कोणी विचार देखील केला नसेल. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता, लेखक, अँकर, कॉमेडियन सायरस ब्रोअचा, दुसरे नाव होते जनता आवाज असलेली अभिनेत्री पूजा भट हिचे. पूजा भट बिग बॉसच्या घरातील १३ स्पर्धक आहे. तर पलक आणि आकांक्षा पुरी यांना होल्डवर ठेवण्यात आले आहे. (Celebrity)

कसा होता बिग बॉस पहिला दिवस ?

पहिल्या दिवशी स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये होताच त्यांना त्यांचा बेडची निवड करायची होती. प्रत्येक बेडवर त्याची खासियत आणि किंमत लिहिलेली होती. स्पर्धकांना प्रेक्षकांनी रँक दिले होतो. त्यामुसार त्यांना बिग बॉस करन्सी देण्यात येणार होती. तर जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सेलिब्रिटी स्पर्धकांचे रँक वर - खाली करू शकत होते.

घरात गेल्यावर स्पर्धकांना पहिला टास्क होता त्याच्या जवळ असलेल्या पैशाने स्वतःसाठी बेड खरेदी करणे. बेडची निवड केल्यानंतर स्पर्धकांना त्या बेडच्या किंमती इतकी बिग बॉस करन्सी गुल्लक (पैसे साठविण्याचा गल्ला) मध्ये टाकायची होती.

पुनीत सुपरस्टारने आणला नाकात दम

सगळे स्पर्धक एकमेकांशी पहिल्या दिवशी तरी छान वागत आहेत. एकमेकांची विचारपूस करत आहेत आणि एकमेकांना ओळखून घेत आहेत. पण यातील एक स्पर्धक पुनीत सुपरस्टारने सर्वांना हैराण केले आहे. त्याने घरात येताच टूथपेस्ट चेहऱ्याला लावून संपवली आहे. तर सॅनिटायजर डोक्यावर ओतले आहे. यामुळे बिग बॉसने पुनीतला ताकीद दिली आहे.

पुनीत इतके करून गप्प बसला नाही. तर तो सतत बडबड करत असून बिग बॉसला देखील सुनावत आहे. त्याला पनलिस्टने १० वा रँक दिल्याने तो खूप नाराज आहे. १० रँक असल्याने त्याला फक्त २० हजारांची बिग बॉस करन्सी मिळाली आहे. इतक्या पैशात त्याला कोणताच बेड घेता आलेला नाही. त्यामुळे तो वॆतागला आहे. तर सतत बिग बॉसचे घर सोडून जाण्याविषयी बोलत आहे. बिग बॉसने देखील त्यातला ताकीद दिली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Vastu Tips: ऑफिस टेबलवर देवाची मूर्ती ठेवणं योग्य का? जाणून घ्या योग्य दिशा आणि नियम

Walmik Karad Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची सुटका नाहीच; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

Amravati : 'सफेद चावल' कोडवर्डने एमडी ड्रग्जची विक्री; अमरावतीतून दोन्ही डिलिव्हरी बॉय ताब्यात

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT