Sunil Grover Viral Post  Instagram @whosunilgrover
मनोरंजन बातम्या

Sunil Grover Post: कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर का आली 'ही' वेळ, फॅन्स म्हणाले '...जरा पुण्य मिळेल'

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या एक फोटो पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunil Grover Viral Post: सुनील ग्रोव्हरने हटके विनोदी स्वभावाची प्रसिद्ध आहे. सुनीलने अनेक कॉमेडी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खूप हसवले. सध्या तो आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसला तरी लोकांचे मनोरंजन कसे करायचे हे त्याला माहीत आहे. सुनील ग्रोव्हरने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सुनील ग्रोव्हर बाईकवर बसून दूध विकताना दिसत आहे. बाईकच्या दोन्ही बाजूला दुधाचे कंटेनर बांधलेले आहेत.

हिवाळ्यातील या थंडीच्या दिवसात थंडी पासून बचाव करण्यासाठी त्याने कानटोपी घातली आहे. तसेच काळ्या रंगाचे उबदार जॅकेट आणि स्वेटर घातले आहे. सुनील ग्रोव्हर बाईकवर बसून दोद्ध विकताना दिसत आहे. सुनीलचा असा अवतार पाहून सगळेच हैराण आहेत. परंतु असे सुनीलने पहिल्यांदाच केलेले नाही.

सुनील ग्रोव्हरची ही पोस्ट अनेकांना खूप रंजक वाटत आहे. फॅन्स त्याच्या या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट देखील करत आहेत. एक नेटकऱ्याने त्याच्या पोस्टवर लिहिले आहे की, दूध नागिणीला पाजा सर, पुण्य मिळेल. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे- दुधात किती पाणी मिसळले आहे? तर आणखी एका नेटकाऱ्याने थेट त्याला त्याच्या कामाविषयी विचारले आहे. नेटकरी म्हणाला की, इन्स्टाग्रामवरच कॉमेडी करत राहणार आहेत की मैदानात पण उतरणार आहात. सुनील ग्रोव्हरने या पोस्टला 'दूध मचाले' असे कॅप्शन दिले आहे.

सुनील ग्रोव्हरला 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमेडीचे संपूर्ण जग फॅन झाले. कॉमेडी व्यतिरिक्त सुनील अभिनयात देखील सक्रिय आहे. सुनील ग्रोव्हरने 'गुडबाय' चित्रपटामध्ये काम केले होते. सुनील ग्रोव्हर तांडव या वेबसीरीजमध्ये देखील दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या देवकुंड धबधब्यात दुर्दैवी दुर्घटना, रेस्क्यू पथकाला मृतदेह शोधण्यात यश

Kitchen Cockroach Problem: किचनमधील झुरळांचा त्रास संपला! रात्री ओट्याजवळ ठेवा 'हा' १ पदार्थ; सकाळी एकही झुरळ दिसणार नाही

गावरान स्टाईल अळंबी रानभाजी तुम्ही कधी खाल्लीये का? सोपी आहे रेसिपी

रेल्वे स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तरुणाने घातले थेट लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

Kids Healthy Breakfast : फक्त ५ मिनिटांत तयार करा मुलांसाठी हेल्दी नाश्ता

SCROLL FOR NEXT