Sunil Grover Share Video On Instagram  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: 'या' अभिनेत्याने हायवेवर विकले शेंगदाणे, चाहत्यांनी कॉमेडियनची घेतली फिरकी...

प्रसिद्ध विनोदी कलाकार रस्त्याच्या कडेला विकत आहे शेंगदाणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunil Grover New Video: हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. हिवाळ्यात काहीतरी गरमागरम खाण्याचा मोह आवरता येत नाही. हिवाळ्यात पोषण मिळवण्यासाठी शेंगदाण्याला खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोक गरम शेंगदाणे विकताना दिसतात. पण हा शेंगदाणा विक्रेता प्रसिद्ध व्यक्ती असेल तर होईल. होय, असेच काहीसे एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध विनोदी कलाकार रस्त्याच्या कडेला गरम शेंगदाणे विकत आहेत. त्याचे हे कृत्य पाहून चाहते त्याच्यावर कमेंट करत आहेत.

व्हिडिओमधील प्रसिद्ध कॉमेडियन दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका सुनील ग्रोवर आहे. सुनील ग्रोव्हर अनेकदा असे व्हिडिओ शेअर करताना दिसतो. सुनील ग्रोव्हर असे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. हा व्हिडिओ शेअर करत सुनील ग्रोव्हरने लिहिले आहे, 'खाओ खाओ खाओ.' त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. (Social Media)

सुनील ग्रोव्हरच्या या व्हिडिओवर चाहते खूप विनोदी कमेंट करत आहेत. 'सर, मला पत्ता द्या, मी आता येतो' असे एका चाहत्याने लिहिले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे, 'क्या दिन आ गये. पण लव्ह यू पाजी. एकाने त्यांना 'डाउन टू अर्थ' असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने भुईमुगाचे दर विचारले आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा सुनील ग्रोव्हर चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. (Comedy)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: राज्य सरकारचा निर्णय मोठा, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

SCROLL FOR NEXT