Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18'मध्ये भाईजानसोबत दिसणार प्रसिद्ध कॉमेडियन, VIDEO शेअर करत दिली माहिती

Krishna Abhishek : 'बिग बॉस 18' लवकरच सुरू होणार आहे. सलमान खान हा शो होस्ट करणार असून या शोमध्ये भाईजानसोबत सर्वांचा लाडका कॉमेडियन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

एकीकडे बिग बॉस मराठी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर दुसरीकडे बिग बॉस 18 हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस 18ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 6 ऑक्टोबरपासून बिग बॉस 18 (Bigg Boss 18 ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस 18 चं होस्टिंग भाईजान करणार आहेत. पण त्यांच्यासोबत कॉमेडियन कृष्णा अभिषेक पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृष्णाने आपल्या विनोदी बुद्धीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बिग बॉस 18 च्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या बातमीचा खुलासा करण्यात आला आहे. बिग बॉसच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कृष्णा मेकअप रूमध्ये बसून मेकअप करत आहे. तेव्हाच 'बिग बॉस'चा एक मेसेज त्याच्या फोनवर येतो. मेसेजमध्ये बिग बॉस म्हणतात की, कृष्णा तू लवकरच तुझ्या मित्रमंडळींसोबत हॉलिडे जाणार आहेस. यावर कृष्णा म्हणतो की, "बिग बॉसला कसे कळले की मी बँकॉकला जात आहे?"

यापुढे कृष्णा (Krishna Abhishek ) म्हणतो, "यार बिग बॉस तर भविष्य पाहतात. यंदा खूप मजा येणार आहे. या सीझनमध्ये होणार टाइमचा तांडव. मी पण तुला तिथे भेटेन" असे बोला आहे. सोबतच त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "दरवर्षी प्रमाणे बिग बॉस येत आहे, सलमान (Salman Khan) भाईसोबत मी पण बिग बॉस मध्ये येणार आहे. " कृष्णाच्या या व्हिडिओमुळे तो भाईजानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, तो केवळ प्रीमियर एपिसोडमध्ये दिसणार की संपूर्ण सीझनचा भाग असेल याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. कारण या आधीपण कृष्णा सलमानच्या शोमध्ये अनेकदा दिसली आहे. 'बिग बॉस 18' स्पर्धक नक्की कोण असणार आणि ते कसा गेम खेळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

कृष्णाच्या या व्हिडिओमुळे तो भाईजानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, तो केवळ प्रीमियर एपिसोडमध्ये दिसणार की संपूर्ण सीझनचा भाग असेल याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. कारण या आधीपण कृष्णा सलमानच्या शोमध्ये अनेकदा दिसली आहे. 'बिग बॉस 18' स्पर्धक नक्की कोण असणार आणि ते कसा गेम खेळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT