Kapil Sharma Sings Sunderkand Path On Ram Navami  Instagram @kapilsharma
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma Post: रामनवमीच्या शुभ दिनी कपिलने केली ही खास गोष्ट, सर्वाचं मन जिंकलं

Ram Navami Special: कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Kapil Sharma Sings Sunderkand Path: देशभरात काळ राम नवमी खूप उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक कलाकारांनी चाहत्यांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. त्याच्या पोस्टमुळे त्याचे खूप कौतुक होत आहे.

कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कपिलने सुंदरकांड पदथनाचा ऑडिओ शेअर केला. राम नवमीच्या दिवशी कपिलने शेअर केलेल्या या ऑडिओमुळे सर्वजण खूप प्रसन्न झाले आहेत.

राम नवमीनिमित्त कपिल शर्माने त्याच्या आवाजातील हा ऑडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'रामनवमीच्या शुभ दिवशी, डॉ. धीरज भटनागर यांच्या श्री रामचरितमानसच्या पहिल्या हिंदी अनुवादावर आधारित सुंदरकांड गायनाने मी धन्य झालो आहे.'

कपिलने गायलेल्या या रामचरितमानासच नेटकरी कौतुक करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे, खूप गोड आहे, आता माझा दिवस खूप छान जाईल. तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे, - काय गायलं आहेस भाव, खूप जिवंत वाटतंय गाणं. तसेच अनेक नेटकरी जय श्री राम अशी कमेंट कपिलच्या पोस्टवर करत आहेत.

कपिल अनेकदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये गाताना दिसतो. त्याला गाण्याची खूप आवड असल्याचे त्याने शोदरम्यान अनेकदा सांगितले आहे. तर रामचरितमानस त्याने खूप सुंदर गायले आहे. कॉमेडियन आणि अभिनेता कपिल याचा नुकताच झ्विगाटो चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा विषय जरी खूप चांगला असला तरी चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

SCROLL FOR NEXT