Big Boss Marathi 5 CANVA
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: "मला जाऊ द्याना...;छोट्या पुढारीची अरबाजला छोटीशी रिक्वेस्ट पाहा Video

Big Boss Marathi New Promo: 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi New Season Day 27 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रंगतदार गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. घरातील सदस्य टास्कदरम्यान भांडणं करत असले तरी एकमेकांसोबत मजा-मस्ती करायला त्यांना आवडते. तसेच त्यांची मजा-मस्ती पाहणं प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरत असतं. अशाप्रकारे आजच्या भागात छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,"अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस". छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो,"नाही जाणार मी अंघोळीला... माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला".

त्यावर घन:श्याम म्हणतोय,"स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही". पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,"तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय". त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,"माझा भाऊ करुदेतना आम्हाला अंघोळ". पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो,"आता कसं वाटतंय".

अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT