Chhaava Movie Rashmika Mandanna as Yesubai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna: 'साऊथ इंडीयन मुलगी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत...'; अशी झाली रश्मिकाची निवड, अभिनेत्रीची ती पोस्ट चर्चेत

Chhaava Movie Rashmika Mandanna: रश्मिकाने 'छावा' चित्रपटात तिची निवड करण्यात आली म्हणून सोशल मिडीयावर चित्रपट निर्मात्यांसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहून आभार मानले.

Shruti Kadam

Rashmika Mandanna: 'छावा' या ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिका साकारणे रश्मिका मंदानासाठी 'मोठे आश्चर्य होते. चित्रपट प्रदर्शनापूर्वी रश्मिकाला महाराणी येसूबाईंची भूमिका साकारता येईल का असा प्रश्न प्रेक्षक विचारात होते. पण छावा या चित्रपटातील तिचे काम पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. रश्मिकाने सोशल मिडीयावर चित्रपट रिलीजनंतरच्या पोस्टमध्ये निर्मात्यांसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहून आभार मानले.

'छावा' या ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट मराठा साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'छावा' चित्रपटाच्या सेटवरील न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले, "महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी दक्षिणेतील एक मुलगी साकारणार हा विचार माझ्या डोक्यात कधी आला नाही. मला कधीच वाटले नव्हते की हे शक्य आहे, आणि म्हणूनच मला अशा लोकांसोबत काम करायला आवडते जे आपल्याला सीमांच्या पलीकडे स्वप्न पाहण्याची आणि ते साकारण्याची क्षमता ठेवतात.

मी मिमी हा चित्रपट पाहिला होता आणि मला तो चित्रपट इतका आवडला की मला लक्ष्मण सरांना माझ्या 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करायचे होते आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला आणि तेव्हा हा प्रवास सुरू झाला. सरांनी लगेच मला विचारले की ते मला फोन करू शकतात का आणि आम्ही बोललो आणि ते मला सांगत होते की त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी मला भेटायचे आहे.. आणि मला वाटले की ते फक्त माझं मन राखत आहेत, पण प्रत्यक्षात आमची भेट झाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला.. मी याबद्दल खरोखर आभारी आहे.

मला या चित्रपटाची कथा माहित नव्हती. ते माझ्याकडे का आले हे मला माहित नव्हते, त्यांनी मला महाराणी म्हणून कसे पाहिले हे मला माहित नव्हते. मला काय घडत आहे हे देखील माहित नव्हते. जेव्हा मी प्रत्यक्षात कथा ऐकली तेव्हा मी गोंधळले, धक्का बसला पण खूप भारावून गेले आणि खूप जास्त आनंद झाला. आणि माझा प्रवास सुरु झाला महाराणी येसूबाई या शक्तिशाली आहेत सुंदर आहे आणि एक खऱ्या महाराणी आहेत आणि इतके खरे आहे की महाराज आणि महाराणी नेहमीच शब्दांच्या पलीकडे जोडलेले असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT