Chava Movie Ticket saam tv
मनोरंजन बातम्या

Chhava Movie Ticket: लाडक्या बहिणींना फ्री बघता येणार 'छावा' चित्रपट

Chhava Movie: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट 'छावा' हा चित्रपट सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे. 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Saam Tv

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट 'छावा' हा चित्रपट सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे. 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्यातील मुख्य भुमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच विकी कौशल तसेच येसुबाईंची भुमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी अनेक मेहनत घेऊन त्यांची भुमिका पार पाडली आहे.

प्रत्येक भारतीय नागरिकाला हा चित्रपट पाहता आला पाहिजे यासाठी नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खास सर्वसामान्य महिलांसाठी मल्टीप्लेक्स थेटरमध्ये मोफत चित्रपट पाहण्याची सोय केली आहे. याने सर्व महिलांना चित्रपटाचा मोफत लाभ घेता येणार आहे. हा चित्रपट महिला सोमवारपासून ते रविवार पर्यंत मोफत पाहू शकतात. तसेच 'छावा' चित्रपट हा कर मुक्त करावा अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ही सुविधा तुम्हाला फक्त अहिल्यानगरमध्ये मिळणार आहे.

'छावा' चित्रपटाचे आत्तापर्यंतचे कलेक्शन

'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन तीनच दिवस झालेत. मात्र त्याची कमाई ही तब्बल १०० कोटींच्या वरचा टप्पा गाठताना दिसत आहे. या चित्रपटाला सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे तीन दिवसाचे कलेक्शन आपण जाणून घेऊ. पहिल्या दिवशी छावा चित्रपटाने ३३.१ कोटींचा टप्पा पार केला. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींचा टप्पा पार केला. त्यासह तिसऱ्या दिवशी ४८.६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

'छावा' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, छावा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. 'छावा' तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. 'छावा' चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई केली आहे. जवळपास ५ कोटींचा व्यवसाय त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT