Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! फक्त ३ दिवसातच १०० कोटींचा टप्पा पार

Chhaava Box Office Collection Day 3 : बॉलिवूडचा सुपरस्टर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने तीन दिवसांत चक्क १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह वाढताना पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal ) 'छावा' (Chhaava) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. फक्त तीन दिवसांत चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

'छावा' चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसातच उंच भरारी घेतली आहे. 'छावा' चित्रपटाने तब्बल १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाल सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 'छावा' चित्रपटाचे तीन दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

  • पहिला दिवस - 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • एकूण - 116.5 कोटी रुपये

भविष्यात 'छावा' चित्रपट अजून बंपर कमाई करून अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपटातील विकी कौशलच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'छावा' चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. लवकरच चित्रपटाचे बजेट आता पूर्ण होणार आहे.

'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. 'छावा'चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्येच छप्परफाड कमाई केली होती. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे तगडे प्रमोशन केले होते. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT