Kushal Badrike  Instagram/ @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike: चांगल्या सिनेमांची ऑफर कशी मिळवायची? कुशल आणि प्रार्थनाने दिला 'हा' सल्ला

सध्या कुशल आगामी चित्रपटामुळे लंडनमध्ये सध्या आगामी चित्रपटाची शूटिंग करीत आहे. नुकताच कुशलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दिग्दर्शक संजय जाधवनं त्याला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

Chetan Bodke

Kushal Badrike Post: कुशल बद्रिके नेहमीच ‘चला हवा येऊ द्या’ मुळे चर्चेत असतो. यावेळी तो आपल्या कार्यक्रमामुळे नाही तर, त्याच्या एका पोस्टमुळे सध्या तो चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर कुशल बद्रिके भलताच चर्चेत पहायला मिळतो. ‘चला हवा येऊ द्या’ मुळे कुशल बद्रिकेचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. नेहमीच तो आपल्या कॉमेडीमुळे सर्वत्र चर्चेत असतो. महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेल्या कुशलची सोशल मीडियावर फॅनफॉलोविंग तगडी आहे. नुकतंच कुशलने एक फनी व्हिडीओ शेअर केली आहे.

कुशल कॉमेडी शोसोबतच चित्रपटातही सध्या काम करीत आहे. सध्या कुशल आगामी चित्रपटामुळे परदेशात शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो लंडनमध्ये सध्या आगामी चित्रपटाची शूटिंग करीत आहे. त्याच्यासोबत दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता संजय नार्वेकर आणि प्रार्थना बेहरे देखील शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. अनेकदा चित्रपटातले सर्व कलाकार शूटिंग स्पॉटवरुन फनी व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

नुकताच कुशलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात दिग्दर्शक संजय जाधवनं त्याला कोणतंही प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून सल्ला दिला आहे. त्याचवेळी संजय नार्वेकरांनी कुशलला यासाठी सल्ला देत संजय जाधवची बोलती बंद केली आहे. कुशलनं शेअर केलेला हा व्हिडीओ भन्नाट आहे.

कुशल बद्रिकेनं व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,‘कलाकार म्हणून एखादं project मिळवणं ही सुद्धा एक कलाच आहे, पण ते कसं मिळवायचं हे जेव्हां आपले seniors आपल्याला शिकवतात…’

कुशलने शेअर केलेल्या व्हिडीओत, सुरुवातीला दिग्दर्शक संजय जाधव, कुशल बद्रिके आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिघे उभे आहेत. आणि दिग्दर्शक संजय जाधव हे कुशल, प्रार्थनाला कोणताही प्रोजेक्ट हातातून जाऊ नये यासाठी काय करायचं हे समजावून सांगताना म्हणतात, “दिग्दर्शकासमोर ब्रॅन्डेड शूज, ब्रॅन्डेड कपडे, ब्रॅन्डेड वॉच घालून जा आणि अंगावर ब्रॅन्डेड परफ्यूम लावा मग बघा दिग्दर्शकाला तुम्हीच त्याच्या सिनेमाचे हिरो किंवा हिरोईन असं वाटायला एक सेकंद देखील लागणार नाही.”

संजय जाधवचा हा सल्ला ऐकून कुशल आणि प्रार्थना धन्य होतात. इतक्यात संजय नार्वेकर तिथे येतात अन् विचारतात काय झालं... त्यानंतर कुशल संजय नार्वेकरांना समजावून सांगताना दिसत आहे. तेव्हा संजय नार्वेकर चांगला प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून काय करायचं यावर एकाच शब्दात उत्तर देत संजय जाधवची बोलती बंद करतात.

नार्वेकर म्हणतात, चांगला प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून ...“उत्तम अभिनय”... एवढंच करा. हे उत्तर ऐकल्यावर कुशल आणि प्रार्थनाचे चेहरे बघण्यासारखे होतात तर संजय जाधव तिकडून पळच काढतात. सध्या कुशलच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत. एकानं कुशलच्या प्रेमात लिहिलं आहे की, ‘तू इतका चांगला अभिनय करतोस की तुझ्या हातून कोणताच प्रोजेक्ट जाणार नाही.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीची १७ जागांवर घसघशीत आघाडी

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन

Former MLA Rahul Bondre : काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी बजावली नोटीस, १५ दिवसांत मागितलं उत्तर; नेमकं प्रकरण काय?

झाडूविषयीचे 7 महत्त्वाचे वास्तू नियम! धनसंपत्ती आणि सुख-समृद्धीसाठी फायदेशीर

मोठी बातमी! महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ गुंडाळल्या, ३ बंद होणार; लाडकी बहीण योजनेचं काय झालं?

SCROLL FOR NEXT