Phule movie controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phule Movie Controversy: सेन्सर बोर्डाला आधी कॉमन सेन्स नव्हता का? 'फुले' चित्रपटावरून आनंद दवे संतापले

Phule Movie: 'फुले' चित्रपटावर सेन्सर बोर्डाने दिग्दर्शक व निर्मात्यांना काही सूचना दिल्या असून चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले आहेत. यामुळे आनंद दवे यांनी सेन्सर बोर्डवर संताप व्यक्त केला आहे.

Shruti Vilas Kadam

अक्षय बडवे, साम टीव्ही

Phule Movie: अनंत महादेवन दिग्दर्शित आणि प्रतीक गांधी आणि पत्रलेखा अभिनीत 'फुले' हा हिंदी बायोपिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'फुले' चित्रपटावर सेन्सर बोर्डाने दिग्दर्शक व निर्मात्यांना काही सूचना दिल्या असून चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सेन्सर बोर्डावर थेट प्रश्न उपस्थित करत विचारले, "सेन्सर बोर्डाकडे आधी कॉमन सेन्स नव्हता का?"

दवे यांनी सांगितले की, आमच्या विरोधानंतर सेन्सर बोर्डाला अचानक चित्रपटात बदल करावेसे वाटले. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, “सेन्सरने आधीच डोळे आणि मेंदू उघडे ठेवून चित्रपट पाहिला असता, तर आतापर्यंत तो प्रदर्शित होऊन एक आठवडाही लोटला असता.”

त्यांच्या मते, सेन्सर बोर्डाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही आणि त्यामुळे ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनावश्यक अडथळे आले. त्यांनी असेही सूचित केले की, हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.

दवे यांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे आता 'फुले' चित्रपटासंदर्भातील वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांची यावर काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, फुले हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे याआधी हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु या चित्रपटटीवर झालेल्या विरोधामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT