Jhoome Jo Pathaan Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Controversy: 'पठान' चित्रपटावर लागली कात्री: दीपिकाचे अनेक सीन्स झाले 'कट'

सेन्सॉर बोर्डाने कात्री लावलेला 'पठान' हा 2023 सालचा पहिला चित्रपट ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Censor Board's Cuts For Pathaan: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटसंदर्भात अनेक बातम्या समोर आल्या. त्यानंतर चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यामुळे देशभर गदारोळ निर्माण झाला.

'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीचा रंग बदलावा किंवा तो सीन काढून टाकावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 'पठान' हा 2023 सालचा पहिला चित्रपट ठरला आहे, ज्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.

माध्यमांना मिळालेल्या अहवालानंतर, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चित्रपटातील आणि गाणी काही सीन्स काढून टाकण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. CBFC ने 'पठान'मध्ये 10 जास्त सीन कट केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'रॉ' शब्दाच्या जागी 'हम्रे', 'लंगडे लुल्ले'च्या जागी 'तूटे फुटे', १३ ठिकाणी 'पीएम' किंवा 'राष्ट्रपती ऐवजी आणि 'पीएमओ' या शब्दात बदलले आहे. अशोक चक्र'च्या जागी 'वीर पुरस्कार', 'एक्स-केजीबी'ला 'एक्स-एसबीयू' आणि 'श्रीमती भारत माता'च्या जागी 'आमची भारत माता' हे शब्द वापरले आहेत.

तसेच या अहवालात म्हटले आहे की, 'स्कॉच' या शब्द 'ड्रिंक'ने बदलण्यात आले होते, तर चित्रपटात दिसणारा 'ब्लॅक प्रिझन, रुस' हा टेक्स्ट 'ब्लॅक प्रिझन' ने बदलण्यात आला होता. याशिवाय 'बेशरम रंग' गाण्यामधील दीपिकाचे अनेक सीन साइड पोजने बदलले आहेत. 'बहुत तंग किया' या गाण्याच्या ओळींवरील तिचा डान्स स्टेप देखील काढून टाकण्यात आल्या आहेत आणि त्या जागी इतर शॉर्ट्स वापरण्यात आले आहेत. मात्र, दीपिका पदुकोणची वादग्रस्त ठरलेल्या ऑरेंज बिकिनीमधील सीन्स सेन्सॉर बोर्डाने कडून टाकले आहेत की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

अनेक बदल केल्यानंतर 'पठान' चित्रपटाला UA प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 2 तास 26 मिनिटांचा हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT