Bigg Boss Marathi 5 New Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’साठी कोण असतील स्पर्धेक? संभाव्य यादी पाहिलीत का ?

Bigg Boss Marathi 5 Contestant List : सध्या सोशल मीडियावर काही स्पर्धकांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार अशी चर्चा सुरू आहे, जाणून घेऊया स्पर्धकांची संभाव्य यादी...

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’चा बहुचर्चित पाचवा सीझन आजपासून (२८ जुलै) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील काही इनसाईड्स फोटोज् व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही स्पर्धकांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार अशी चर्चा सुरू आहे, जाणून घेऊया स्पर्धकांची संभाव्य यादी...

मिडिया रिपोर्टनुसार, 'मन झालं बाजींद' फेम वैभव चव्हाण, 'भाग्य दिले तू मला' फेम विवेक सांगळे, स्प्लिट्सव्हिला फेम अरबाज पटेल, परदेशी मॉडेल इरिना रुदोकावा, इंडियन आयडॉल फेम आणि गायक अभिजित सावंत, रॅपर आर्या जाधव, अभिनेता शुभंकर तावडे, बिग बॉस फेम निकी तांबोळी यांच्या नावाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कलर्स मराठीच्या सोशल मिडिया पेजवर हिंट दिलेल्या फोटोंवरून किंवा व्हिडिओंवरून या स्पर्धकांची चर्चा होत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर आज २८ जुलैला रात्री ९ वाजता पार पडतोय. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात कोण कलाकार जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT